`मला पुन्हा एकदा त्याच्यासोबत...`, रणबीरसोबत न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीनं सांगितला अनुभव
Trupti Dimri on Ranbir Kapoor : तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
Trupti Dimri on Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर त्याचा डंका वाजवला आहे. या चित्रपटात अॅक्शन, ड्रामा, थ्रिल सगळंचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटात असलेल्या कलाकारांनी अप्रतिम अभिनय केल्याचे सोशल मीडियावर म्हटलं आहे. त्या पैकी एक अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी आहे. तृप्ती डिमरीचा रणबीरसोबत असलेला न्यूड सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यांची अनेकांनी स्तुती देखील केली. तृप्तीनं चित्रपटात जोया ही भूमिका साकारली आहे. दरम्यान, रणबीरसोबत काम करण्याच्या अनुभवावर तृप्तीनं प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत तृप्तीनं 'ॲनिमल' चित्रपटातील रणबीर कपूरसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. तिनं म्हटलं की 'रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ते सांगित तृप्ती म्हणाली, रणबीरसोबत काम करायला खूप छान वाटलं. तो एक अप्रतिम अभिनेता आहे. त्यासोबतच रणबीर हा उत्साही होऊन तुमचं स्वागत करतो. मला त्याच्यासोबत काम करायला खूप मज्जा आली. रणबीरसोबत माझी ऑनस्क्रिन पाहून प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं आहे, ते खूप चांगलं वाटतंय. आशा आहे की भविष्यात पुन्हा एकदा रणबीरसोबत नक्कीच काम करेनं.'
तृप्ती डिमरनं तिच्या करिअरची सुरुवात की 2017 मध्ये केली. तिचा पहिला चित्रपट पोस्टर बॉइज होता. त्याशिवाय ती नेटफ्लिक्सवरील 'कला', 'बुलबुल' आणि लैला मजनूसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. इतकंच नाही तर तृप्ती डिमरी ही अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या देखील चर्चा होती. पण त्या दोघांचं रिलेशन जास्त काळ टिकलं नाही आणि दोघांनी याचवर्षी जुलै महिन्यात ब्रेकअप केला. पुढे तिच्या विषयी बोलायचे झाले तर ज्या नेटफ्लिक्सच्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती त्यातील दोन चित्रपट म्हणजेच 'कला' आणि 'बुलबुल' हे दोन्ही कर्णेशच्या प्रोडक्शनच्या बॅनर खाली होते. कर्णेशच्या प्रोडक्शन कंपनीचं नावं क्लीन स्लेट फिल्म आहे.
दरम्यान, पिंकव्हिलानं दिलेल्या माहितीनुसार, 'ॲनिमल' चित्रपटानं तीन दिवसात 340 कोटींचं ग्रॉस वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, मास्टर आणि आरआरआरनंतर रणबीरचा 'ॲनिमल' चित्रपट हा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. ज्यानं ओपनिंग विकेंडलाच बॉक्स ऑफिसवर #1 स्पॉट मिळवणारा पहिला हिंदी चित्रपट आहे.