मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अंडरटेकर यांची मोठ्या पडद्यावर दिसलेली ऐतिहासिक लढाई तर तुमच्या लक्षात असेलच... पण, या लढाईमागचं सत्य कदाचित तुमच्यापर्यंत अद्याप पोहचलेलं नसेल... 'खिलाडीयों का खिलाडी' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार आत्तापर्यंत आठ 'खिलाडी' असं नाव असलेल्या वेगवेगळ्या सिनेमांत दिसलाय. मार्शल आर्ट एक्सपर्ट असलेल्या अक्षयचा ओढा स्पोर्टस आणि स्टंटकडे अधिक राहिलाय. 'खिलाडीयों का खिलाडी' या सिनेमातील एका सीनमध्ये अक्षय कुमार WWE चा प्रसिद्ध खेळाडू 'द अंडरटेकर' याच्यासोबत फायटिंग करताना दिसला होता... पण, हा अंडरटेकर खराखुरा होता की नकली? हा प्रश्न अद्यापही प्रेक्षकांच्या मनात रेंगाळल्याशिवाय राहत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'खिलाडीयों का खिलाडी' या सिनेमात अक्षय कुमारसोबत रेखा आणि रविना टंडन यादेखील प्रमुख भूमिकेत होत्या. या सिनेमातील एका सीनमध्ये अक्षय अंडरटेकरसोबत लढतो आणि त्याला पराभूतही करतो... पण, तुम्हाला माहीत नसेल की या सिनेमात खराखुरा अंडरटेकर नव्हताच... तर अंडरटेकरची भूमिका ब्रायन ली यानं निभावली होती. ब्रायन ली अंडरटेकर याचा चुलत भाऊ आहे.



ब्रायनचं पूर्ण नाव ब्रायन ली हॅरिस असं आहे. ब्रायन लीदेखील एक प्रोफेशनल रेसलर आहे. या सिनेमात अंडरटेकरच्या भूमिकेसाठी त्याच्यासारखाच दिसणाऱ्या ब्रायनची निवड करण्यात आली... ब्रायन अगदी थोड्यावेळासाठी मोठ्या पडद्यावर दिसला असला तरी तो बराच भाव खाऊन गेला... अनेक प्रेक्षकांना तो अंडरटेकर नाही हे कळलंदेखील नाही... आणि म्हणूनच आजदेखील अनेकांना तो अंडरटेकर नव्हताच, हे कळलंदेखील नाही.