मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनाक्षी सिन्‍हा (Sonakshi Sinha) हिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या फोटोंमध्ये तिच्या हातात असणाऱ्या अंगठीनं सर्वांच्या नजरा वळवल्या. बरं, सोनाक्षीनं हे पोस्ट केलेले फोटो पाहून ती कोणा व्यक्तीला लपवतेय असंही म्हटलं गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाक्षीच्या चेहऱ्यावर  असणारा आनंद आणि जणी काही आपला साखरपुडाच झाला आहे, असं भासवणारी अभिनेत्री पाहून अनेकांनीच तिला शुभेच्छा दिल्या. अगदी बॉलिवूडकरही तिला शुभेच्छा देण्यात मागे राहिले नाहीत. 


बरं, आता अशी बातमी येतेय की ही सोनाक्षी सर्वांची फसवणूक करून गेली. कारण तिचा साखरपुडा वगैरे काही झालेलं नाही. 


सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षी तिचं एक नवं प्रॉडक्ट लाँच करत आहे. हा ब्रँड आहे, आर्टिफिशिअल नेल्स अर्थात कृत्रिम नखांचा. तिच्या आधीच्या पोस्ट पाहिल्यास ेक लक्षात येईल की तिथंही ती नखं फ्लाँट करताना दिसत आहे. 


सोनाक्षीच्या या ब्रँडचं नाव SOEZI असं आहे. अद्यापही ती या प्रोडक्टमधून आणखी कोणकोणत्या सुविधा पुरवणार आहे हे मात्र कळू शकलं नाही. पण, चित्रपटांव्यतिरिक्तही ती काही नव्या संकल्पना राबवताना दिसत आहे हे खरं. 


अभिनयासोबतच नवनवीन व्यवसाय क्षेत्रांमघ्ये सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आता सोनाक्षीचं नावही आसं आहे. अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, आलिया भट्ट यांच्यासोबतच आता सोनाक्षीचं नावही यात गणलं जाणार आहे.