मुंबई : झी मराठीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीच्या आहेत. झी मराठी कायमच आपल्या प्रेक्षकांचा विचार करून नवनवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. झी मराठीवरील मालिका कायमच नंबर 5 मध्ये असतात. यामध्ये माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, लागीरं झालं जी आणि तुझं माझं ब्रेकअप या मालिकांचा समावेश आहे. या मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मात्र आता यातील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीवरील 'तुझं माझं ब्रेकअप' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. समीर आणि मिराचा नातं या मालिकेत कसं फुलतं आणि त्यानंतर त्यामध्ये कशा गोष्टी बिघडतात. या गोष्टी दाखवण्यात आलं आहे. असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसंच काहीसं समीर आणि मीरा बाबतीतही झालेलं प्रेक्षकांनी पाहिलं. लग्नानंतर सुरु झालेली संसाराची तारेवरची कसरत, लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढून भांडायला लागतात आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की ते दोघे वेगळे होतात.


पण आता मिरा आणि समिर पुन्हा एकत्र येणार का? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ही मालिका आता प्रेक्षकांच्या निरोप घेण्याच्या तयारीत आहे. या जागी एक नवी मालिका येणार आहे. याचा प्रोमो 15 जुलै रोजी म्हणजे रविवारी 8 वाजता दाखवता येणार आहे.