मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi)  लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) . या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मन जिंकली होती. मालिकेत कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या मालिकेतील एका कलाकाराने आपल्या साखरपु्ड्याचा फोटो शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाला सखी ही मॅटवर कुस्ती शिकवताना दिसते. सखी हे पात्र अभिनेत्री ऋचा आपटेने (Rucha Apte) साकारले आहे. आता सोशल मीडिया पोस्टद्वारे ऋचाने एक वर्षभरापूर्वी साखरपूडा केल्याचे सांगितले आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.


ऋचाने अभिनेता क्षितीश दाते याच्याशी साखपुडा केला आहे. त्याच्यासोबतचा फोटो ऋचाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याबरोबर तिने हॅशटग वापरत engagementin2020 असे लिहिले आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.



ऋचानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये क्षितीज आणि ऋचा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघंही जवळपास दोन वर्ष एकमेंकांना डेट करत होते. अर्थात ही गोष्ट त्यांनी आपल्या चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. परंतु सोशल मीडिया व व्हायरल होणाऱ्या त्यांच्या फोटो मार्फत अखेर दोघांच्या नात्याबाबत चाहत्यांना कळलेच.


त्यानंतर ऋचा आणि क्षितीजनं पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ खाली चाहते त्यांच्या नात्याबाबत त्यांना सवाल करत. अखेर चाहत्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे आजच्याच दिवशी त्याच्या साखरपुड्याला एक वर्ष पुर्ण झालं. या निमित्ताने चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.