Tujhse Naraz Nahi Zindagi Singer Anup Ghoshal Death : 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मासूम' या चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. आजही कोणीही हे गाणं ऐकलं तरी त्यांच्या मनाला शांती मिळते. या गाण्याला आवाज देणारे गायक अनूप घोषाल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी अनूप घोषाल यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे अनुप गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. शुक्रवारी दुपारी 1.40 वाजता अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील अनूप घोषाल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी श्रद्धांजली वाहत म्हणाल्या, 'अनुप घोषाल यांच्या जाण्यानं म्यूजिक इंडस्ट्रीला खूप मोठा झटका बसला आहे.' संगीत विश्वासोबतच अनुप घोषाल हे राजकारणात देखील सक्रिय होते. 2011 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उत्तरपारा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली होती. त्यांनी फक्त निवडणूक लढली नाही तर ते विजेते देखील ठरले होते. 


अनूप घोषाल यांनी 'सत्यजीत रे' यांच्या अनेक गाण्यांना अमर बनवलं आहे. त्यांच्या निधनानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनूप यांच्या कुटुंबाविषयी बोलायचे झाले तर त्यांना दोन मुली आहेत. त्यांनी काजी नजरूल इस्लाम, रवींद्रनाथ टागोर आणि आधुनिक बंगाली गाणी गात त्यांची प्रतिभा दाखवली आहे. याशिवाय त्यांनी सत्यजीत रे यांच्या 'गोपी गाइन बाघा बाइन' आणि 'हीरक राजार देशे' शी देखील संबंधीत होते. तपन सिन्हा सारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात अनूप घोषाल यांनी गाणी गायली आहेत. तर अनूप घोषाल यांनी हिंदीत 'तुझसे नाराज नहीं जिंदगी', 'जिनके हृदय श्रीराम बसे', 'मन के मंदिर में', 'गुरु बिन', 'अंखिया हरिदर्शन को प्यारी', 'मोहे लागी लगन' पासून 'मधुर अमर' पर्यंत अनेक गाण्यांना आवाज दिला होता. 


हेही वाचा : तू मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शारिरीक संबंध ठेवलेत का? प्रश्न ऐकताच रणबीरनं केला अर्जुनला किस, म्हणाला...


अनूप यांनी वयाच्या 4 थ्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. जेव्हा चे 19 वर्षांचे झाले तेव्हा सत्यजीत रे यांची नजर त्यांच्यावर पडली. 'गूपी गेन बाघा बेन' मध्ये काम केलं. सत्यजीत रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनूप घोषाल यांना गायनात राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवला होता. त्यांनी आजवर बंगाली, हिंदी, भोजपुरी आणि असमिया भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत.