मुंबई : खारी बिस्किट या मराठी सिनेमाचं पहिलं गाणं यूट्यूबवर रिलीज झालं आहे. गायिका रोनकिनी गुप्ता आणि गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. तुला जपणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, असे या गाण्याचे बोल आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


खारी बिस्किट ही लहान बहिण भावाची स्टोरी आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधी चर्चेत आला आहे. वेदश्री खाडीलकर आणि आदर्श कदम या कलाकारांनी धमाल उडवून दिली आहे. या सिनेमाचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे.