MOVIE REVIEW : तुम्हारी सुलु
बॉलीवूड विश्वात आज विद्या बालनचा तुम्हारी सुलु हा सिनेमा प्रदर्शित झालाय. एका मध्यमवयीन कुटुंबातील महिलेची ही कहाणी आहे.
मुंबई : बॉलीवूड विश्वात आज विद्या बालनचा तुम्हारी सुलु हा सिनेमा प्रदर्शित झालाय. एका मध्यमवयीन कुटुंबातील महिलेची ही कहाणी आहे.
ही आहे कथा
मुंबईत राहणा-या एका मध्यम वर्गीय महिलेची कहाणी या सिनेमात खूपच रंजक पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न, दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी केलाय.. ही गोष्ट आहे सुलोचना या सामान्य गृहिणीची.. अचानक सुलोचना उर्फ सुलु जेव्हा रेडियो जॉकी अर्थातच आर जे बनते, तेव्हा तिच्या आयुष्यात काय काय बदल घडतात, काय ट्विस्ट्स येतात अशा काहीशा लाईन्सवर जाणारा तुम्हारी सुलु हा सिनेमा आहे..रेडिओ जॉकी झाल्यानंतर सुलुला एका रात्रीत प्रसिद्धी मिळते.. ती आता अपेक्षेपेक्षा जास्त पॉप्युलर होते. सुलु एक सामान्य गृहिणी असल्यामुळे ती करियरसोबत आपलं घरही छान सांभाळते..
दमदार अभिनय
या सिनेमात सुलुच्या नव-याची व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता मानव कौलनं. ज्यानं आपली भूमिका चोख पार पाडली आहे.. अभिनेत्री विद्या बालन सुलुच्या व्यक्तिरेखेत एकदम फिट बसते. खूपच सहज आणि ग्रेसफुली तिनं ही भूमिका साकारलीये.. तुम्हारी सुलु या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा विद्या बालनला एक दमदार व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळालीये यात शंका नाही..
हलका फुलका एंटरटेनर
तुम्हारी सुलु हा एक हलका फुलका लाईट एंटरटेनर सिनेमा आहे. सिनेमाचा पूर्वार्ध मजेशीर झालाय. हळू हळू हा हलका फुलका एंटरटेनर सिनेमा थोडासा सीरीयस ट्रॅकवर वळवला जातो.. इथेच खरंतर सिनेमा जरा डगमगतो.. सिनेमाची पटकथाही जरा खटकते. सुलुच्या नजरेतून रेखाटण्यात आलेला तुम्हारी सुलु हा संपूर्ण सिनेमा तुम्हाला नक्कीच एंटरटेन करणार यात शंका नाही..
सिनेमातला यूएसपी आहे सुलु हे कॅरॅक्टर.. प्रत्येक अडचणीचा सामना करताना सुलु नेहमी एकच वाक्य म्हणते - मै कर सकती है.. खरंतर हा सिनेमा पाहताना सुलु सारख्या अनेक सामान्य महिलांना स्वत:ला या कॅरेक्टरशी रिलेट करता येतं, खरंतर याच गोष्टीमुळे सिनेमा तुम्हाला खिळवून ठेवतो.. तुम्हारी सुलु हा एक कंप्लिट फॅमिली एंटरटेनर सिनेमा आहे.
स्टार्स - 3.5 स्टार्स