मुंबई : अभिनेत्री विद्या बालन 'तुम्हारी सुलु' या सिनेमातून अनेक दिवसांनंतर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसमोर येणार आहे... या सिनेमातलंच दुसरं गाणंही सध्या सोशल मीडियावर गाजताना दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मनवा पंख लगा के लाइक्स टू फ्लाय' हे या सिनेमातील गाणं गुरुवारी प्रदर्शित करण्यात आलंय. शाल्मली खोलगरे हिच्या आवाजातलं हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरतंय. 


यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेलं 'हवा हवाई' हे गाणंही प्रेक्षकांना आवडलेलं दिसत होतं. या गाण्यातून अभिनेत्री श्रीदेवीला ट्रिब्युट देण्यात आलाय. 


'तुम्हारी सुलु' हा सिनेमा २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, आता या तारखेत बदल करत १७ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.