Tunisha Sharma Death: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (committed suicide) केली आहे. तुनिषाने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. सेटवर उपस्थित असलेल्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी दिला मृत घोषित केलं. तुनिषा शर्माने आत्महत्या का केली?, असा सवाल उपस्थित होत असतानाच आता मोठी अपडेट समोर आली आहे. (Tunisha Sharma suicide case Her mother files complaint against actor Sheezan Khan for alleged abetment marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई पूर्वेच्या कामण येथील स्टुडिओमध्ये तिने गळफास लावला. फक्त 20 वर्षाच्या या कवळ्या जीवाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने बॉलिवूडमध्ये (Tunisha Sharma News) चर्चेला उधाण आलंय. तुनिषा शर्माने आत्महत्येला जबाबदार कोण?, असा सवाल उपस्थित होत असताना तुनिषाच्या आईने (Tunisha Sharma Mother) वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.


पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरुन अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) याच्या विरोधात गुन्हा दाखल (Tunisha's mother files complaint) केला आहे. शिझान खानला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची (detained for questioning) माहिती सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. शिझान मोहम्मद खानच्या त्रासाला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात सविस्तर माहिती अद्याप दिली नाही.


आणखी वाचा - Shocking News : वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्री Tunisha Sharma ने उचललं टोकाचं पाऊल, सेटवरच संपवलं जीवन


दरम्यान, आत्महत्या करण्याच्या काही वेळ आधी तुनिषाने एक इन्टाग्राम पोस्ट (Tunisha Sharma Instragram) केली होती. एक फोटो तिने शेअर केला होता. जे त्यांच्या पॅशनने प्रेरित आहेत ते थांबत नाहीत, असं कॅप्शन तुनिषाने दिलं होतं. तुनिषाप्रमाणेच शिझानही (Sheezan Khan) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.