Tunisha Sharma Property : वयाच्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माकडे इतक्या कोटींची संपत्ती, ऐकून बसेल धक्का
Tunisha Sharma नं मालिकेच्या सेटवर असलेल्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली आहे. तिच्या निधनानंतर सगळ्यांचा धक्का बसला आहे.
Tunisha Sharma Property : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा नं (Tunisha Sharma) आत्महत्य केली आहे. तिला तातडीनं रुग्णालयात येण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी Tunisha Sharma ला मृत घोषित करण्यात आलं. Tunisha Sharma नं तिच्या मेकअप रुममध्येच पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तुनिषानं वयाच्या 20 व्या वर्षी इतकं मोठं पाऊल उचललं आहे. तुनिषा पुढच्या वर्षी 4 जानेवारी 2023 रोजी 21 वा वाढदिवस साजरा करणार होती. परंतु त्याच्या काही दिवसांआधीच तिनं आत्महत्या केली. दरम्यान, तुनिषानं तिच्या अभिनयानं नाव कमावण्यासोबतच कोट्यवधींची संपत्तीही कमावली होती.
तुनिषाच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होते. तुनिषाची आई, भाऊ आणि बहिण हे चंदीगडला राहतात. तुनिषा ही मुळची चंदीगडची आहे. तुनिषाचं शालेय शिक्षण हे येथेच झालं. तुनिषाला डान्स आणि अभिनयात आवड असल्यामुळे तिनं अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुनिषा मुंबईत आली होती. तुनिषानं बालकलाकार म्हणून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तुनिषाची संपत्ती ही 2 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 15 कोटींची असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे.
हेही वाचा : "एकत्र राहायचे नव्हते तर मग इतक्या..."; तुनिषाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा मोठा खुलासा
तुनिषानं फक्त मालिका नाही तर चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिनुषानं कतरिना कैफसोबत ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ या चित्रपटात काम केलं. तर भाईजान सलमान खानसोबत 'दबंग 3' चित्रपटात काम केलं. याशिवाय तिनं ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’ या सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मालिकांविषयी बोलायचं झालं तर तुनिषानं अभिनय क्षेत्रातली तिची सुरुवात ही ‘भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप’ या मालिकेतून झाली होती.
शीझान मोहम्मद खान कोण?
शीझान मोहम्मद खानचा (Sheezan Mohammed Khan) जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबई येथे झाला. त्याने टीव्ही मालिकांमधून स्वत:च्या करिअरला सुरुवात केली. त्याने झी टीव्ही मालिका, जोधा अकबर या मुराद मिर्झा/यंग अकबरच्या भूमिकेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने कलर्स टीव्हीच्या सिलसिला प्यार का मध्ये विनय सक्सेनाच्या भूमिकेत काम केले. सध्या तो सब SAB टीव्हीच्या 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' मध्ये अली बाबाची भूमिका साकारत आहे. शीझानला दोन मोठ्या बहिणी आहेत, फलक नाझ आणि शफाक नाझ त्या दोघींची नावं असून त्या दोघी टेलिव्हिजन अभिनेत्री आहेत. काही वर्षांपूर्वी शीझान तुनिषा शर्माच्या आधी 'कुंडली भाग्य' फेम मृणाल सिंगला डेट करत होता. तो गेल्या 10 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्याने अनेक मोठ्या मालिकांमध्ये महत्तवाची भूमिका बजावून चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्यानं त्याच्या दमदार अभिनयाने स्वत:ची ओळख घरोघरी पोहचवली.
तुनिषा गर्भवती होती?
तुनिषाच्या मृत्यूनंतर अनेक खोटे वृत्त प्रसिद्ध होत असल्याचेही समोर आले आहे. तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याचं म्हटले जात आहे. पोलिसांनी आणि तुनिषाच्या कुटुंबियांनी याबाबत आता महत्त्वाची माहिती दिली आहे. तुनिषा गर्भवती नसल्याचा खुलासा तिच्या कुटुंबियांनी केला आहे