Manasi Naik On Tunisha Sharma Case : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्मानं (Tunisha Sharma) 24 डिसेंबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली आहे. तुनिषा ही फक्त 20 वर्षांची होती. तुनिषाच्या आत्महत्येनंतर त्याचे कारण मालिकेतील तिला सहकलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खान असल्याचे म्हटले जात आहे. तिच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या भावना सोशल मीडियावर शेअर करत तिच्या कुटुंबाच्या दु: खात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या सगळ्यात मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकनं (Manasi Naik) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना शेअर केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसी नाईकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मानसीनं तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मानसीनं मरून रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसते.  मानसी हा फोटो शेअर करत म्हणाली, जगात कोणत्याही गोष्टीचा विचार न करता किंवा त्या घटनेचा सामना न करता सरळ सोडून देणं हे खूप सोपं आहे. मात्र, मी माझ्या पालकांना वचन दिलं आहे की मी कधीच हार मानणार नाही. तसंच कोणत्याही गोष्टीला सोडणार नाही. माझ्यात असलेल्या इच्छाशक्तीला कमी लेखू नका. वाईटवेळ ही प्रत्येकावर येते आणि आता ती वेळ माझ्यावर आली आहे. पण मी रडणार नाही आणि माझं मन दु: खवणार नाही. माझं हृदय हे माझ्या आईशी जोडलं गेलेलं आहे. नऊ महिने माझ्या आईनं माझा सांभाळ केला मला मोठं केलं...  मी मोठी होत आहे आणि ग्लो करते कारण मी समस्या नव्हती... आई-बाबांची लाडकी राजकन्या. असं मानसीनं पोस्टमध्ये म्हटलं.



तुनिषा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सेटवरच तिने मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या जाण्याने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.


हेही वाचा : मध्य रात्री Ex-Husband ला का भेटायला गेली Malaika Arora? पाहा व्हिडीओ


मानसी नाईक ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा (Manasi Naik Pradeep Kharera Divorce) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीनं दुजोरा दिला होता. 


कोण आहे मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा? 


मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते