मध्य रात्री Ex-Husband ला का भेटायला गेली Malaika Arora? पाहा व्हिडीओ

Malaika Arora आणि अरबाज खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या दोघांना एकत्र स्पॉट केल्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Updated: Jan 4, 2023, 04:06 PM IST
मध्य रात्री Ex-Husband ला का भेटायला गेली Malaika Arora? पाहा व्हिडीओ title=

Malaika Arora and Arbaaz Khan Spotted Together : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी सुद्धा नेहमीच चर्चेत असते. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. फक्त सोशल मीडिया पोस्ट नाही तर मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) असलेल्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. बऱ्याचवेळा मलायका ही पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) दिसते. हे दोघे त्यांचा मुलगा अरहानसाठी एकत्र येतात. आता ते दोघे हे पुन्हा एकदा एकत्र दिसले आहे. यावेळी मलायका बोल्ड (Malaika Arora Bold) अंदाजात दिसली. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे मलायकानं अरबाज ज्या प्रकारची वागणूक दिली त्यानं वेधले आहे. 

मलायका अरोरा आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानसोबत मंगळवारी दिसली. दोघेही त्यांच्या मुलासाठी म्हणजेच अरहान खानसाठी (Arhaan Khan)  एकत्र दिसतात. मात्र, यावेळी दोघे एकटे दिसले. यावेळी मलायका बोल्ड अंदाजात दिसली होती. मलायकानं निळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं असून त्यावर स्वेटशर्ट परिधान केलं आहे. यावेळी मलायकानं काळ्या रंगाचं ब्लेझर परिधान केलं होतं. तर मलायकाच्या बूट्सनं देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ विरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला आहे. या व्हिडीओत अरबाज खान एका बिल्डिंगमधून एन्ट्री करत होत्या. त्यावेळीच मलायका पाठून येते आणि अरबाजला इग्नोर करत पुढे निघून जाते. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ना ती अरबाजसाठी थांबत नाही तर ती पुढे निघून जाते. तर दुसरीकडे अरबाज जेव्हा मलायकाला पाहतो तेव्हा लगेच तिच्या मागे गप्प चालू लागतो. (Malaika Arora and Arbaaz Khan Viral Video) 

अरबाजनं यावेळी काळ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. तर त्याच्या हातात एक बॉटल देखील आहे. तर ही बॉटल गिफ्ट रॅप केली आहे. त्याच्या हातातील बॉटल पाहता ते गेट-टू-गेदरसाठी एकत्र आल्याचे दिसते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : Video : 'पतली कमरिया बोले हाय हाय' गाण्यावर Bhau Kadam च्या लेकीचा भन्नाट डान्स

दरम्यान, मलायकाच्या ड्रेसिंग सेन्सची लेक अरहाननं खिल्ली उडवली होती.  'तू आता जेलमध्ये असलेल्या कैदींसारखी दिसते. मुलाच्या या वक्तव्यावर मलायकानं काही रिअॅक्ट केलं नाही आणि ती हसू लागली.' असं अरहानं 'Moving In With Malaika' या शोमध्ये म्हणाला होता.