Tunisha Sharma And Salman Khan : बाल कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने बॉलिवूडचा दबंग सलमान खान ( Salman Khan) याच्यासोबतही काम केले आहे. 'कहानी 2' आणि 'दबंग 3' हे तिचे मुख्य चित्रपट आहेत. तिने 'दबंग 3'मध्ये सलमान खानसोबत काम केले आहे. कमी वयात ती प्रसिद्धीच्या शिखरावर असताना टोकाचे पाऊल का उचलले, असा सवाल उपस्थित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूला जबाबदार कोण?, आज शवविच्छेदन अहवाल


तुनिषा शर्मा केवळ 20 वर्षांची होती. 'भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप' या टीव्ही मालिकेतून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने चक्रवर्ती अशोक सम्राट', 'गब्बर पुंचवाला', 'शेर-ए-पंजाब :  महाराजा रणजीत सिंह', 'इंटरनेट वाला लव', 'इश्क सुभानल्ला'मध्ये काम केले आहे.


तुनिषा या सिनेमात झळकलेय


तुनिषाने अनेक हिंदी सिनेमात काम केले आहे. फितूर, बार बार देखो, कहानी 2आणि दबंग 3 - हे तिचे मुख्य चित्रपट आहेत. फितूर आणि बार बार देखो या चित्रपटांमध्ये तिने तरुणीच्या कतरिना कैफ हिची भूमिका साकारली होती. कहानी -2 मध्ये तुनिषा ही विद्या बालनची मुलगी म्हणून काम केले आहे तर दबंग 3 मध्ये तुनिषा एका छोट्या भूमिकेत दिसली होती.


सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोईंग


तुनिषा शर्मा हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग होती. इन्स्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक चाहते तिला फॉलो करत होते. सोशल मीडियावर ती नेहमी आनंदी आणि सक्रीय असे. ती चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असे. मृत्यूच्या काही तास आधी तिने शेवटची पोस्ट शेअर केली होती. तिची आता चर्चा होत आहे.


'अली बाबा'च्या सेटवर संपवले आयुष्य


Tunisha Sharma:  तुनिषा शर्माने शनिवारी संध्याकाळी अली बाबाच्या सेटवर मेकअप रूममध्ये आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तुनिषा आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सहकलाकार शीझान खानला अटक केली आहे. तुनिषाच्या आईने शीझान खानवर गंभीर आरोप केलेत.आईच्या तक्रारीवरुन शीझानवर कलम 360 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुनिषाला आत्महत्येसाठी परावृत्त केल्याचा आरोप शीजानवर ठेवण्यात आलाय.शीझानसोबत ब्रेकअप झाल्यामुळे नैराश्येतून तुनिषाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.


तुनिषा शर्मानं वसईच्या कामण स्टुडिओत मालिकेच्या सेटवरील मेकअपरूमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. अलिबाबा दास्ताने काबूल या प्रसिद्ध मालिकेत ती काम करत होती. 20 वर्षांच्या तुनिषाच्या आत्महत्येमुळे सध्या अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत