व्हिडिओ : लाडूने नंदिनीची अशी उडवली खिल्ली
लाडू का देतोय नंदिनीला त्रास
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. त्यात आता ''लाडू'' म्हणजे राजवीरची एन्ट्री झाली आहे. राजवीर आपल्या गोड बोलण्याने सगळ्यांच मन जिंकत आहे. लाडूची मालिकेत एन्ट्री झाल्यापासून प्रेक्षकांना देखील मजा येत आहे. राणा आणि पाठक बाईंनी लाडूला मनापासून स्वीकारलं आहे. पण नंदिनी वहिनी मात्र लाडूला सतत त्रास देताना दिसत आहे. मात्र लाडूपण काही कमी नाही त्याने वहिनीला चांगली फैलावर घेतलं आहे. या व्हिडिओत पाहा लाडू नंदिनीला कसं त्रास देतो?
लाडूची मालिकेतील एन्ट्री ही मालिकेला नक्कीच वेगळं वळण देईल यात काही शंका नाही. लाडू राणासोबत तालमीत जातोय तसेच पाठक बाई देखील आता लाडूच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' मधील लाडूच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? यासाठी या लिंकवर क्लिक करा.