'तुझ्यात जीव रंगला' मधील लाडूच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका टीआरपीमध्ये नंबर 1 ला आहे. या मालिकेत आता 'लाडू' ची म्हणजे राजवीर या छोट्या कुस्ती पैलवानाची एन्ट्री झाली आहे. राणा आणि अंजलीने या लाडूची जबाबदारी घेतल्यामुळे मालिकेला एक वेगळंच वळण मिळालं आहे. या सिनेमातील लाडू सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनला आहे.

'तुझ्यात जीव रंगला' मधील लाडूच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?  title=

मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका टीआरपीमध्ये नंबर 1 ला आहे. या मालिकेत आता 'लाडू' ची म्हणजे राजवीर या छोट्या कुस्ती पैलवानाची एन्ट्री झाली आहे. राणा आणि अंजलीने या लाडूची जबाबदारी घेतल्यामुळे मालिकेला एक वेगळंच वळण मिळालं आहे. या सिनेमातील लाडू सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनला आहे.

राजवीर म्हणजे लाडू याचं खरं राजवीरसिंह रणजीत गायकवाड आहेत.  राजवीरसिंह याचा जन्म २२ ऑक्टोबर २०१३ साली सांगली येथे झाला असून आता तो ४ वर्षांचा आहे. त्याचे वजन २५ किलो आहे. राजवीरसिंह यांचे वडील रणजीत गायकवाड हे प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन आहेत. वेट लिफ्टिंग मध्ये त्यांनी सलग 52 राज्यस्तरीय व 10 राष्ट्रीय तसेच अनेकदा इंटरनॅशनल स्पर्धा खेळले. त्यात त्यांना अनेकदा गोल्ड मेडल हि मिळाले. त्यानंतर भारतीय सेनेत त्यांनी मानाची नोकरी पत्करली. तर आई ‘पल्लवी रणजित गायकवाड’ ह्या एम. कॉम आणि एम. बी. ए. इन फायनान्स मधून पदवीधर आहेत. काही काळ त्या सांगली जिल्हामध्यवर्ती बँकेत अकाऊंटण्ट ही आहे. पण सध्या राजीवरच्या उज्वल भविष्यासाठी कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या आहेत. 

‘लाडू’ चे आजोबा “विठ्ठल कृष्णा गायकवाड” हे देखील प्रसिद्ध कुस्ती पैलवान होते. विठ्ठल गायकवाड वस्ताद हे सांगली जिल्ह्यातील कसबे डीग्रज गावात टेलिफोन खात्याचे कर्मचारी होते. टेलिफोन कुस्ती स्पर्धेत विठ्ठल गायकवाड यांचं नाव नेहमीच अग्रस्थानी असायचं. साधारण ४ वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. आपल्या मुलाने आपल्यासारखच कुस्तीत नाव कमवाव असं त्यांना नेहमी वाटायचं. त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा नातू म्हणजेच आपला लाडका लाडू कोल्हापुरात दाखल झाला.

Image may contain: 1 person

‘लाडू’ हा सध्या मोतीबाग तालीम येथून कुस्तीचे धडे घेत आहे. तर कोल्हापुरातील ‘लिट्ल वंडर स्कूल’ मध्ये तो शिकत आहे. शाळेतही तो तितकाच हुशार आहे. त्याला फुटबॉल, चेस, बैडमिंटन खेळाची आवड आहे. “लाठी-काठी” ह्या शिवकालीन खेळाचाही तो सध्या सराव करतोय. काही दिवसांपूर्वी लाठी-काठी चा सराव करताना डेन्मार्क येथून काही मंडळी डॉक्युमेंटरी तेथे आली आणि त्यांनी आपल्या लाडू चे काही फोटो आणि क्लिप्स घेऊन गेले. लवकरच हि लाठी-काठी ची डॉक्युमेंटरी हि प्रसिद्ध होणार आहे.

‘लाडू’ हा सध्या मोतीबाग तालीम येथून कुस्तीचे धडे घेत आहे. तर कोल्हापुरातील ‘लिट्ल वंडर स्कूल’ मध्ये तो शिकत आहे. शाळेतही तो तितकाच हुशार आहे. त्याला फुटबॉल, चेस, बैडमिंटन खेळाची आवड आहे. “लाठी-काठी” ह्या शिवकालीन खेळाचाही तो सध्या सराव करतोय. काही दिवसांपूर्वी लाठी-काठी चा सराव करताना डेन्मार्क येथून काही मंडळी डॉक्युमेंटरी तेथे आली आणि त्यांनी आपल्या लाडूचे काही फोटो आणि क्लिप्स घेऊन गेले. लवकरच लाठी-काठीची डॉक्युमेंटरी प्रसिद्ध होणार आहे.