तुझ्यात जीव रंगला | औद्याने सखीला पाहिलं आणि...
तुझ्यात जीव रंगला या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ३० जुलैच्या एपिसोडची सुरुवात एका दुकानाच्या बाहेरून होते.
मुंबई : तुझ्यात जीव रंगला या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ३० जुलैच्या एपिसोडची सुरुवात एका दुकानाच्या बाहेरून होते, जिथे तालीम कोच फत्तेसिंग हुडा जलेबी खात खात राणाच्या मॅनेजर मॅडमचा घमंड या जिलेबीसारखाच चावुन खाईन असं दुकानदाराला आणि अजून एका सहकाऱ्याला सांगत असतो.
तेवढ्यात समोरून राणाची मॅनेजर येते आणि राणाला ट्रेनिंग देण्याच्या चार गोष्टी खडसावूना सांगते आणि चांगले पॅकेज घेऊन आले आहेत तर थोडे काम ही करा अशी कान उघडणी करून निघून जाते.
ती निघून जाताच माझ्यापेक्षा वयाने छोटी असेलली मुलगी मलाच शिकवून जाते असं रागाने पुटपुटत तो दुकानांपुढील पायरीवर बसतो व जेव्हा वेळ येईल तेव्हा माझ्या नावाचा इंगा दाखवतोच असे स्वतःशीच म्हणतो. दुसरीकडे गावकरी एका मिटिंगसाठी औद्याची वाट बघत खोळंबलेले असतात. परंतु औद्या न आल्याने खोळंबलेले गावकरी मिटिंगचा विषय कोणता आहे असं सारखं विचारात असतात. दरम्यान मिटींग सुरु होते व मीटिंगचा खरा मुद्दा कोणता हे कळतो. राणाची मॅनेजर वेळोवेळी राणाचा अपमान करत आहे तर त्या अपमानाचा बदला घ्यायचा असे सारे म्हणतात.
पण आपल्या गावच्या पाहुण्यांचा अपमान म्हणजे साऱ्या गावाचा अपमान असे म्हणत राणा सर्वांना मध्येच थांबवतो. दरम्यान एक म्हणतो तिला मळ्यात राबायला लावू तर कुणी म्हणतो आपली ताकद दावू तर कुणी म्हणतो तिच्या घरी घुशी सोडू म्हणजे घाबरून पळून जाईल. पण असं पाहुण्यांना घाबरवणे बरं नाही आणि हे सारे अंजली बाईंना कळले तर माझी काही खैर नाही असे राणा सर्वांना सांगतो.
सारे तर्क वितर्क लढवूनही अपमानाचा बदल कसा घ्यायचा हेच कुणाला कळत नाही. तेवढ्यात औद्या म्हणतो आपण साऱ्यांनी मिळून मॅनेजरला निषेधाचे एक पत्रच लिहूया व इथून पुढं राणादाचा अपमान खपवून घेणार नाही असं खडसावून सांगूया. त्यावरही राणा चा नकारच येतो. पण बाकीचे काही ऐकत नाही व निवेदन लिहिण्यासाठी चावडीवर जातात.
दुसरीकडे राणाचे छोटे मित्र राणाच्या मॅनेजरला सखीला अद्दल घडवण्यासाठी तिच्या मार्गावर सापळा रचतात. दरम्यान राणाचे गावकरी मित्र आपला निषेध निवेदन घेऊन सखीच्या दरवाजावर धडकतात पण दरवाजाची बेल वाजवण्याची कुणाचीच हिम्मत होत नाही. तेवढ्यात तिथे त्यांना फत्तेसिंग भेटतो आणि राणाचे गोडवे गाऊ लागतो.
राणाचे मित्र मॅनेजर सखीचा निषेध करायला आले आहेत हे फत्तेसिंगला कळताच तोही आपली भाकरी भाजून घेतो आणि जोरदार निषेध करा असे कळवळून सांगतो व दरवाजा ठोकण्यास घाबरणाऱ्या गावकऱ्यांना मी स्वतःच दरवाजा ठोकतो. सखी दरवाजा उघडून बाहेर येते आणि तिचे सौंदर्य पाहून सारे गावकरी अवाक होतात. सखीला पाहून औद्याचं मन बदलतं आणि तो सखीला सांगतो की हे सारे गावकरी निषेधाचा निवेदन घेऊन आहे आहेत मी फक्त त्यांच्या बरोबर आहे.
हे ऐकताच गावकरी गडबडून जातात आणि सखी औद्याला म्हणते, या सर्वांमध्ये तुम्हीच एक समजदार दिसताय. सखीचे प्रेमळ बोलणे ऐकून औद्या गावकऱ्यांपुढं निशेधनामा फाडून टाकतो. याने संतापलेले गावकरी औद्याला चांगला चोप देतात. तेवढ्यात सखीच्या घरी राणाचे छोटे मित्र येतात आणि राणाची माफी मग असे आवाज चढवून बोलतात, त्यावेळी एक मुलगा सखीचे हेडफोन्स घेऊन पळून जातो.
दरम्यान रेणू आणि अंजली राणाबद्दल बोलत चालत असताना रेणू अंजलीला म्हणते सखीबद्दल मागचे पुढचे ठाऊक नसताना तिच्या ताब्यात राणाला देणे हे काही बरं नाही. पण तिच्या बोलण्याकडे अंजली दुर्लक्ष करते. पुढे तेवढ्यावरच रेणू न थांबता पुढे म्हणते की, राणादा किती भोळा आहे हे तुला ठाऊक आहे ना? आणि जास्तवेळ व तो ज्याच्या सानिध्यात राहतो त्याचेच काही वेळाने ऐकू लागतो याकडे जरा लक्ष दे नाहीतर हातातून निसटून जाईल नवरा हे लक्षात ठेव. रेणूच्या बोलण्याचा विचार अंजली करेल का आणि राणाला मॅनेजर सखी पासून दूर ठेवील का?