तुझ्यात जीव रंगला : राणा `डाएट` कसं फॉलो करणार?
मुंबई : तुझ्यात जीव रंगला या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ६ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात राणाच्या घरापासून झाली. अंजली घरातील सर्व लहान मुलांना सांगते गावात जाऊन सांगा की, राणादाचे डाएट सुरु आहे त्यामुळे त्याला ताकाशिवाय दुसरे काहीच खायला देऊ नका. गावात दवंडी पिटवावी तसे लाडू आणि बाकीची मुले सर्व गावकऱ्यांना डाएटची खबर देतात. दरम्यान भुकेने व्याकुळ झालेला राणा धुर्प मावशीच्या घरासमोर येऊन थांबतो. राणाला भूक लागली आहे असे तिला कळते व ती राणाला बसायला टेबल देते आणि घरातून गार गार ताक आणून देते.
ताक पिऊन राणा घराकडे जात असताना वाटेत त्याला वडापाव भाज्यांचं दुकान दिसते, जिथे राणाचा भाऊ आणि औद्या भजी खात असतात. परंतु तेथेही राणाला ताकच प्यायला मिळते. गावात ज्या ज्या घरी जातो त्या त्या घरी राणाला फक्त ताकच प्यायला मिळते त्याने राणाच्या भुकेची फारच कोंडी होते. दुसरीकडे अंजलीवर रुसलेला राणा अंजलीला माझं जेवण बंद केलंत असं रागाने बोलतो. ताक पिऊन पिऊन मी पार आंबून गेलोय असे सांगतो. पण अंजली त्याचे काहीच ऐकत नाही. पूढे लडिवाळपणे राणा अंजलीला गुपचूप खाऊया कुणालाही ना सांगताच. पण अंजली काही एक ऐकायला तैयार नसते. एवढ्यात गोदाक्का लाडूला जेवण घेऊन येते आणि गोदाक्काच्या काळजाला हात घालतो व म्हणतो माझी जराही कदर नाही का ग तुला गोदाक्का? व चेहरा पार रडवेला करतो.
राणाची हालत बघून गोदाक्का जेवण द्यायला तैयार होते पण, अंजली राणाला खोलीत बंद करून गोदाक्का आणि लाडूला खाली घेऊन जाते. भुकेने व्याकुळ झालेला राणा डाएट पाळेल की नाही हे पाहण्यासाठी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा पुढील रंगतदार एपिसोड आवर्जून बघा.