मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'तुझ्यात जीव रंगला'ने ५०० भागांचा प्रवास पूर्ण केलाय. महाराष्ट्रदिनी या मालिकेने ५०० भाग पूर्ण केले. ऑक्टोबर २०१६मध्ये सुरु झालेली ही मालिका अद्याप प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकेपैकी एक आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंच्या जोडीला लोकांची विशेष पसंती मिळतेय. मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने या मालिकेतील कलाकारांनी सेटवर केक कापून सेलिब्रेशन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेत पाठक बाईंची भूमिका साकारतेय अक्षया देवधर तर राणादाची भूमिका साकारलीये हार्दिक जोशीने. यात राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी दाखवण्यात आलीये. राणादा कोल्हापुरातील प्रतिष्ठित आणि शिक्षणमंत्र्यांचा मुलगा. मात्र त्याचे शिक्षण झालेले नसते. शिक्षण झालेले नसले तरी शेतीमधील विकसित तंत्रज्ञानाची त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. शेतकरी तसेच पहेलवान असलेला या राणादाच्या प्रेमात पडतात पाठकबाई. 


पाठकबाई भरपूर शिकलेल्या. शहरातून आलेल्या असतात. राणादाचा भोळ्या स्वभाव पाठकबाईंना आवडतो. त्यातून त्या राणादाच्या प्रेमात पडतात. त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी कशी फुलते. मात्र या प्रेमकहाणी त्यांची वहिनीच हिच खलनायिका असते. ती हरप्रकारे राणादा आणि पाठकबाई यांना एकत्र न येण्यासाठी विविध डावपेच लढवते. मात्र त्यावर मात देत राणादा आणि पाठकबाई कसे एकत्र येतात. हे आतापर्यंत या मालिकेत दाखवण्यात आलेय.


५०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने करण्यात आलेल्या सेलिब्रेशनवेळेस राणा आणि अंजली यांनी पारंपारिक पोशाख परिधान केला होता. अंजलीने साडी तसेच नथ घातली होती. यात तिचा लूक अत्यंत सोज्वळ असा होता.