मुंबई : 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या अत्यंत लोकप्रिय पौराणिक मालिका 'रामायण' मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. दीर्घ काळापासून आजारांनी त्रस्त होते. आजारी असल्यामुळे त्यांना चालताही येत नव्हते. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनानंतर कलाविश्वाने आणखी एक कलाकार गमावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरविंद त्रिवेदी यांचा भाचा कैस्तुभ त्रिवेदी यांनी त्यांच्या काकांच्या निधनाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'गेल्या काही वर्षांपासून काका आजारी होते. अशात जवळपास तीन वेळा त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं. एक महिन्यापूर्वीचं ते रुग्णालायातून घरी आले. पण मंगळावारी रात्री 9.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि कांदिवली येथील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले.'


'रामायण' नंतर अरविंद त्रिवेदी यांनी 'विक्रम आणि बेटाल' शिवाय अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. पण आजही ते रामानंद सागर यांच्या 'रामायण' मधील रावणाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी 300 हून अधिक गुजराती आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि अनेक गुजराती नाटकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.