Sidharth Shukla Death: अखेरच्या फोन कॉलवर कोणाशी, काय बोलला सिद्धार्थ?
मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून हा चेहरा घराघरात पोहोचला होता.
Sidharth Shukla Death: 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा विजेता, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचं गुरुवारी निधन झालं. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार सिद्धार्थचं निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे अर्थात हार्ट अटॅकमुळे झालं अशी माहिती समोर आली. मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून हा चेहरा घराघरात पोहोचला होता.
सिद्धार्थच्या जाण्याचं वृत्त अनेकांच्या पचनी उतरणं कठीण होतं. कालपर्वापर्यंत आपल्याशी हसतखेळत बोलणारा हा चेहरा आज आपल्याच नाही, ही बाब अनेकांनाच स्वीकारणं कठीण. सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच सेलिब्रिटींनी यासंदर्भातील भावना व्यक्त केल्या.
अभिनेता करण कुंद्रा यानं आपलं सिद्धार्थशी त्याच्या निधनाच्या एक दिवस आधी, म्हणजेच 1 सप्टेंबरला फोनवर बोलणं झाल्याचं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त कळताच करणलाही हादरा बसला.
Siddharth पश्चात शेहनाजची 'ती' बांगडी आता तिला कोण देईल...? पाहा मन हेलावणारा व्हिडीओ .....
त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, 'धक्कादायक... काल रात्रीच आम्ही एकमेकांच्या आयुष्यात सारंकाही सुरळीत सुरु आहे ना याबाबत विचारपूस करायला फोनवरुन संपर्क साधला होता. तू ठीक आहेस याबाबतच आपण बोललो ना रे.... माझा विश्वासच बसत नाहीये... खूप लवकर गेलास... तुझ्या आत्म्यास शांती लाभो, तुझा हसरा चेहरा कायमच स्मरणात राहील....'
Bigg Boss 13 या रिअॅलिटी शोचा विजेता असणाऱ्या सिद्धार्थला, 'बालिका वधू' या मालिकेनं घराघरात पोहोचवलं होतं. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्याचं असं जग सोडून निघून जाणं कुटुंबासोबतच, कलाजगत आणि चाहत्यांनाही धक्का देऊन गेलं. सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असं कुटुंब आहे.