Sidharth पश्चात शहनाजची 'ती' बांगडी आता तिला कोण देईल...? पाहा मन हेलावणारा व्हिडीओ .....

त्यांचं नातं नेमकं कसं होतं, सांगतोय हा व्हिडीओ... 

Updated: Sep 2, 2021, 04:44 PM IST
Sidharth पश्चात शहनाजची 'ती' बांगडी आता तिला कोण देईल...? पाहा मन हेलावणारा व्हिडीओ ..... title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

Sidharth Shukla : टेलिव्हीजन आणि चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध चेहरा, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झाल्याचं वृत्त गुरुवारी समोर आलं. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. (sidharth shukla death)

सिद्धार्थच्या अचानक निधनामुळे त्याच्या चाहत्यांना आणि कलाविश्वाला मोठा हादरा बसला. तिथं अनेकांनीच सिद्धार्थची कथित प्रेयसी शहनाज गिल हिची नेमकी काय अवस्था असेल याबाबतचे प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

मृत्यूच्या केवळ 6 दिवसांपूर्वी सिद्धार्थ शुक्ला याने केले उदात्त काम, म्हणाला होता, आयुष्य खूप स्वस्त झाले आहे!

 

शहनाजबाबत (shehnaaz gill) अनेकांनीच काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केलेली असतानाच तिथं सिद्धार्थ आणि त्याच्या या प्रेयसीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खुद्द शेहनाजनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला होता. जिथं सिद्धार्थ आपल्याला आवडतो, असं सांगत शहनाजनं त्याच्यासाठी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.

माधुरी दीक्षितनं शहनाजला तिच्या मनातील त्या परफेक्ट व्यक्तीबद्दलचा प्रश्न विचारताच क्षणार्धाचाही विचार न करता शहनाजनं सिद्धार्थ आपल्याला आवडतो असं सांगितलं होतं. डान्स दिवाने या कार्यक्रमामध्ये त्यांनी खास उपस्थिती लावत या भागात एक परफॉर्मन्सही दिला होता. जिथं एका बांगडीवरुन त्यांनी सुरेख स्कीट केलं. यादरम्यान, या दोघांचीही केमिस्ट्री पाहण्याजोगी होती. सिद्धार्थ आणि शहनाजची ही केमिस्ट्री म्हणजे अनेक प्रेमी जोड्यांसाठी #CoupleGoals देणारी ठरली. पण, आता मात्र नात्याची ही घट्ट वाटणारी घडी अशी काही विस्कटली आहे की कितीही प्रयत्न केले तरीही ती पूर्ववत होणं कठीणच.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x