New Year Gift FromShoaib Ibrahim to Dipika Kakkar : छोट्या पडद्यावरील अभिनेता शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) आणि त्याची पत्नी दीपिका कक्कर (Dipika Kakkar) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सध्या हे दोघेही बऱ्याचकाळापासून अभिनयापासून लांब आहेत. शोएब आणि दीपिका हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशा परिस्थितीत त्यांचे घर कसे चालत असेल असा प्रश्न देखील अनेकांना येतो. या सगळ्यात शोएबनं दीपिकाला नवीन वर्षाची  भेट म्हणून BMW X7  ही कार भेट दिली आहे.  आता त्यावरून इतका खर्च कसा चालतो असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्षाच्या निमित्ताने शोएबनं दीपिकाला ही गाडी भेट म्हणून दिली आहे. शोएबनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो  शेअर केले आहेत. शोएबनं कार शोरूममधून हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो  शेअर करत शोएबनं कॅप्शन देत लिहिलं की '2022 सालचा प्रवास खूप चांगला गेला. सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते आणि आज आम्ही इथे उभे आहोत. कुटुंबासह या मोठ्या एडिशनला सेलिब्रेट करत आहोत. आमच्या नवीन आलिशान कार BMW X7 घरी घेऊन जात आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद, आनंदाने भरलेला आहे. दीपिका हे खास तुझ्यासाठी, यासाठी मी खूप आभारी आहे.' शोएबनं घेतलेल्या या गाडीची किंमत ही जवळपास 1.78 कोटीं असल्याचे एका रिपोर्टमध्ये  म्हटले आहे. 



दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी 2018 साली सप्तपदी घेतल्या. दीपिका कक्कर आणि शोएब  इब्राहिम या दोघांनी 'ससुराल सिमर का' या मालिकेत काम करून घराघरात स्वत: ची एक जागा मिळवली आणि ते प्रत्येक  कुटुंबाच्या आयुष्यातील एक भाग झाले. 'ससुराल सिमर का' च्या शूटिंग दरम्यान, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्यात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दीपिका कक्करचा आधी विवाह झाला होता म्हणून शोबसोबत राहण तिच्यासाठी कठीण होतं. त्यानंतर दीपिका कक्करनं पहिल्या पतीला घटस्फोट दिला आणि शोएब इब्राहिम याच्याशी लग्न केलं.


हेही वाचा : हाईटच केली राव ! केवल 3 इंच उंचीसाठी 'या' अभिनेत्यानं तब्बल 85 लाख मोजले, पाहा उंची वाढली का?


दरम्यान, लग्नाच्या 4 वर्षांनतर दीपिका आणि शोएब च्या आई-वडील होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्या दोघांपैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. दीपिका आणि शोएब हे त्यांच्या प्रेग्नंसीविषयी काहीही बोलले नाही. परंतू शोएबची बहिन सबा इब्राहिमनं तिच्या व्लॉगमध्ये वहिनी दीपिकाच्या प्रेग्नंसीविषयी इशारा दिला आहे. YouTuber सबा तिच्या व्लॉगमध्ये चाहत्यांशी बोलताना म्हणाली की, वहिनी दीपिकाची तब्येत ठीक नाही. याआधी जेव्हा सबा इब्राहिम तिच्या व्लॉगमध्ये लग्नाच्या भेटवस्तू अनबॉक्स करत होती, तेव्हा तिचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं. पण दीपिका कक्कर तेथेही नव्हती. सबाने व्लॉगमध्ये म्हटले होते, दीपिका तब्येत बरी नसल्याने ती बाजारात गेली नाही. इतकंच नाही तर दीपिकाचा व्लॉग पाहिल्यानंतरही तिला प्रेग्नंट असल्याच्या सूचना लोकांना मिळाल्या.