मुंबई  : कलर्स चॅनलवरील 'नागिन' सिरिअलमध्ये नागिन 'शेषा'ची भूमिका साकारणारी अदा खान सायबर क्राइमची शिकार झाली आहे. तिचे डेबिट कार्ड हॅक करुन २ लाखाचा गंडा घातला गेला.


२ लाखांचा गंडा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजतक.कॉमच्या वृत्तानुसार, अदा खानने सांगितले की तिच्या अकाऊंटमधून २४ हजार रुपये गेले. आपल्या कार्डचा उपयोग केला जातोय हे तिच्या लक्षात आले.


त्यानंतर तिला सलग ४ मेसेज आले यामध्ये तिचे २ लाख रुपये गेले. 


कार्ड ब्लॉक


तिने लगेच बॅंकेत फोन करुन डेबिट कार्ड ब्लॉक केले. बॅंक आणि पोलिसांनी यात चांगली मदत केल्याचे अदा खानने सांगितले.