मुंबई : टीव्ही जगतात अशा काही सुंदर अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या बोल्ड अभिनयाने बॉलिवूड अभिनेत्रींचेही पत्ते कट केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'कुमकुम भाग्य' फेम शिखा सिंह. ही अभिनेत्री किती बोल्ड आहे याची साक्ष तिची सोशल मीडियाच देते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती आता एका मुलाची आई झाली असली तरी आई झाल्यानंतरही तिचा हॉटनेस कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आई झाल्यानंतर शिखा सिंगने तिच्या चाहत्यांचं आणखीनच बोल्ड स्टाईलमध्ये मनोरंजन केलं आहे. ही अभिनेत्री अनेकवेळा स्तनपान करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.


एका मुलाची आई आहे शिखा
शिखा सिंगने 1 मे 2016 रोजी तिचा बॉयफ्रेंड करण शाहसोबत लग्न केलं. करण हा व्यवसायाने पायलट आहे आणि या कपलने गुजराती रितीरिवाजानुसार लग्न केलं होतं. लग्नानंतर चार वर्षांनी शिखाने एका मुलीला जन्म दिला. अभिनेत्री तिच्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शिखाने अनेकवेळा आपल्या बाळाला फिडींग करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे तिला खूप ट्रोल देखील केलं गेलं.



सोशल मीडियावर शिखा सिंगचा ब्रेस्ट फिडींग करतानाचा फोटो शेअर करणं अनेक युजर्सना आवडलं नसलं तरी अनेक सेलिब्रिटींनी असं केल्याने तिचं कौतुक केलंय.  सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणा-या मुलांचें सामान्यीकरण करण्याचं समर्थन केलं होतं. कुमकुम भाग्य या टीव्ही शोमध्ये शिखाचे पात्र खूप लोकप्रिय झालं होतं. शिखा सिंगने कॉमेडीच्या क्षेत्रातही हात आजमावला आहे. 2008 मध्ये 'ज्युबिली कॉमेडी सर्कस'मध्ये तिने लोकांना खूप हसवलं.