Father's Day : बॉलिवूडचे 'हे' 7 कलाकार आहेत सिंगल पॅरेंट; एकानं तर अंदमान-निकोबारच्या 6 मुलांना घेतलंय दत्तक

लहानपणापासून मोठे होण्यापर्यंत आई-वडील हे आपल्याला सगळ्याच अडचणीतून वाचवतात. काहीही असो मग मुलांनी हाक मारली की सगळ्यात आधी धावून जाते ती आई. पण आज फादर्स डे च्या निमित्तानं आपण अशा कलाकारांविषयी जाणून घेऊया. जे सिंगल फादर आहेत आणि त्यांच्या मुलांच्या पहिल्या हाकेला धावून जातात. 

| Jun 16, 2024, 15:20 PM IST
1/7

करण जोहर

करण जोहरनं त्याच्या चित्रपटातील रोमान्समुळे नेहमची चर्चेत असतो. खरा रोमान्स काय असतो तो सगळ्यांना त्याच्या चित्रपटातून कळला. पण सरोगसीच्या मदतीनं 2017 मध्ये तो दोन मुलांचा वडील झाला. यश आणि रुही अशी त्यांची नावं आहेत. 

2/7

चंद्रचूड सिंग

एकेकाळी चंद्रचूड सिंगच्या अभिनयाची फार क्रेझ होती. तर चंद्रचूड हा त्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यानं एकट्यानं मुलाचा सांभाळ केला आहे. 

3/7

बोनी कपूर

बोनी कपूर ही एक निर्माते असून श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी कपूर आणि खूशी कपूर यांचा सांभाळत आहेत. 

4/7

राहुल बोस

राहुल बोसनं अंदनान - निकोबारच्या सहा मुलांना दत्त घेतलं आहे. तर त्या मुलांचा तो सिंगल पेरेंट म्हणून सांभाळ करतो. 

5/7

कमल हासन

कमल हासन यांना दोन मुली आहेत. श्रृती आणि अक्षरा या दोघींना ते सिंगल पेरेंट आहेत. कमल हासन हे त्यांच्या मुलीला पाठिंबा देताना दिसतात. 2004 ला सारिकाशी घटस्फोट घेतल्यानंतर कमल हासन हे सिंगल पेरेंट आहेत. 

6/7

राहुल देव

राहुल देव मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायक असला तरी खऱ्या आयुष्याच तो एक चांगला वडील आहे. रीना देवच्या निधनानंतर त्यानं एकट्यानं मुलगा सिद्धार्थ देवला आई-वडील दोघांचे प्रेम दिले. 

7/7

तुषार कपूर

तुषार कपूर 2016 मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून मुलगा लक्ष्यचे स्वागत केले. तर तुषार एकटा लक्ष्यला सांभाळत आहे.