प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
मुंबई : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. देशात आतापर्यंत 57 लाख 32 हजार 519 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. यामध्ये आता टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती श्वेताने एका वेबसाइटला दिली आहे. सध्या तिने स्वतःला राहत्या घरी क्वारंटाईन केलं आहे.
श्वेता सध्या सोनी टीव्हीवरील 'मेरे डॅड की दुल्हन' मालिकेत काम करत आहे. १६ सप्टेंबर रोजी तिला कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणं असल्याचं जाणवू लागलं होतं. त्यामुळे तिने स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली असता तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तिने स्वतःला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, श्वेताची मुलगी पलक तिवारी घरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन पूर्ण काळजी घेवून करत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्वेताने तिच्या लहान मुलाला पती अभिनव कोहलीच्या घरी ठेवलं आहे.
श्वेताला १७ सप्टेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. तिने स्वत:ला १ ऑक्टोबर पर्यंत घरातच क्वारंटाईन करून घेतलं आहे. तर २७ सप्टेंबरला तिची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचं तिने सांगितलं आहे.
देशात आतापर्यंत 57 लाख 32 हजार 519 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 46 लाख 74 हजार 988 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या भारतात 9 लाख 66 हजार 382 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.