Shweta Tiwari Birthday: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी तिच्या सौंदर्य आणि बोल्ड लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते. नेहमी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करून चाहत्यांना ती घायाळ करत असते. सौंदर्यासोबतच श्वेता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री 4 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'कसौटी जिंदगी' या मालिकेतून अभिनेत्रीने आपली ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत तिने प्रेरणाची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली आहे. 


श्वेता तिवारीचं पहिले लग्न 


अभिनेत्री श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरी यांच्यासोबत लग्न केलं आहे. अभिनेत्रीला एक मुलगी आहे. तिचे नाव पलक आहे. पलकने देखील अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला असून सोशल मीडियावर देखील ती प्रचंड चर्चेत असते. श्वेता तिवारीचे राजा चौधरीसोबतचे नाते 2007 मध्ये तुटले. दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी श्वेता तिवारीने राजा चौधरीवर मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. 


श्वेता तिवारीचे दुसरे लग्न


राजा चौधरीनंतर श्वेता तिवारीने अभिनव कोहलीशी लग्न केलं. 2013 पूर्वी त्यांनी 3 वर्षे एकमेकांना डेट केलं होते. त्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला. 2019 मध्ये श्वेता तिवारीने अभिनव कोहलीवर देखील घरगुती हिंसाचाराचा आरोप करत त्याच्यावर तक्रार दाखल केली आणि त्याच वर्षी दोघांचा घटस्फोट झाला. 



या काळात श्वेता तिवारीने अनेक छोट्या-छोट्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचबरोबर अभिनेत्रीने अनेक भोजपुरी चित्रपटी केले. भोजपुरी चित्रपटातील मनोज तिवारीसोबतची तिची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. तसेच अभिनेत्रीने चिराग पासवानच्या चित्रपटात आयटम साँग देखील केले होते. यानंतर अभिनेत्रीने बिग बॉसमधून करिअरचा एक मोठा टप्पा गाठला. दमदार अभिनयाने आणि खेळाने तिने बिग बॉस शो जिंकला होता. 


सोशल मीडियावर बोल्ड लुकने चर्चेत 


सध्या देखील अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील ती प्रचंड सक्रिय असते. नेहमी चाहत्यांसाठी नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.