Twinkle Khanna Birthday: सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी म्हणून ओळख असणाऱ्या ट्विंकल खन्नाचा (Rajesh Khanna Daughter Twinkle Khanna) आज वाढदिवस आहे. अभिनेत्री म्हणून नव्वदच्या काळात ट्विंकल खन्ना तिची चांगली ओळख प्राप्त केली होती. अक्षय कुमारही (Akshay Kumar Wife Twinkle Khanna) त्यावेळी सुपरस्टार झाला होता. ते दोघंही जणं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. परंतु त्यावेळी सर्वांत जास्त चर्चा रंगल्या होत्या त्या ट्विंकल खन्नाच्या प्रेग्नन्सीच्या. ट्विंकल खन्ना लग्नाआधीच अगोदर होती अशी चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. आजही या चर्चा जोरदार होत असतात. आज पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे. अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला 20 हून अधिक वर्ष पुर्ण झाली आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा आरव (Arav Kumar) हाही अनेकदा चर्चा होत असते. (Twinkle Khanna Birthday was twinkle khanna really pregnant before marriage rumours that are still discussed) 


लग्नाआधी ट्विंकल गरोदर होती? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या लग्नानंतर अशा अनेक चर्चा रंगायला लागल्या जेव्हा त्या दोघांना आरव हा मुलगा झाला की ट्विंकल ही लग्नाआधी गरोदर होती. या अफवांच्या कायमच चर्चा होत राहिल्या होत्या. आजही या चर्चा कायम होत राहतात. त्यांचे लग्न 2001 साली झाले होते आणि सप्टेंबर 2002 साली त्यांचा मुलगा आरव याचा जन्म झाला. त्यांचा मोठा मुलगा आरव हा वीस वर्षांचा आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना याला नितारा कुमार नावाची लहान मुलगीही आहे. राजेश खन्ना यांच्या मृत्यूच्या दरम्यान तिचा जन्म झाला आहे. नितारा 10 वर्षांची आहे. 


अक्षय आणि ट्विंकलचा दोनदा साखरपुडा? 


अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा दोनदा साखरपुडा (Akshay Kumar - Twinkle Khanna  Engagement) झाला होता अशा अफवाही त्यावेळी रंगल्या होत्या. इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटाच्या सेटवर ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार भेटले होते. त्याचवेळी त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. आज इतक्या वर्षात त्यांचा सुखी संसारही यशस्वी झाला आहे. बी-टाऊनमध्ये (B-town) तर त्यांच्याकडे बेस्ट आणि आयडिल कपल म्हणून ओळखले जाते. त्याचसोबत त्यांच्या सुखीसंसाराबद्दल बी-टाऊनमध्ये अनेकदा चर्चा होते. त्यांचे फॅमिली फोटोजही व्हायरल होत असतात. त्यांचा पहिला साखरपूडा काही कारणांमुळे होऊ शकला नव्हता. तर दुसऱ्या साखरपुड्याच्या वेळी ते दोघंही एकमेकांशी कमिटेड होते.