मुंबई : गेले काही दिवस 'जीएसटी' बरोबरच 'पद्मावती' या चित्रपटावरुन जोरदार चर्चा झडत आहेत. बॉलिवूडमध्ये 'मिस फनी बोन्स' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्विंकल खन्नानं या दोन्ही विषयांवर तिच्या हटके स्टाइलनं ट्विट करत आपल्या खास शैलीत मल्लीनाथी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच हरियाणातील एका नेत्यानं राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा कोटींचं बक्षीसही जाहीर केलंय. या धमकीची खिल्ली उडवणारं ट्विट ट्विंकल खन्नानं केलंय.
 


'शिरच्छेद करणाऱ्याला मिळणाऱ्या या दहा कोटींच्या रकमेवरही जीएसटी लागणार का? हे देशाला जाणून घ्यायचं आहे' असा उपहासात्मक प्रश्न विचारत तिनं पद्मावतीच्या विरोधकांची खिल्ली उडवलीय. तसंच, 'पद्मावती' हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू दे. जेणेकरून धमकी देणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळेल' असंही तिनं म्हटलंय.