मुंबई : अक्षय़ कुमारचा टॉयलेट : एक प्रेमकथा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. या सिनेमाचे प्रेक्षकही तोंडभरुन कौतुक करतायत. याच दरम्यान अक्षयची पत्नी ट्विंकलने ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. यात एक व्यक्ती मोकळ्या जागेत शौच करत असल्याचे दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो शेअर करताना तिने म्हटलंय, गुड मॉर्निंग...मला वाटते की हा टॉयलेट एक प्रेमकथा पार्ट २चा पहिला सीन आहे. 


या फोटोद्वारे ट्विंकलला सार्वजनिक शौचालयाचे महत्त्व सांगायचे आहे. प्रत्येक घरामध्ये शौचालय असणे जितके गरजेचे आहे तितकीच गरज सार्वजनिक शौचालयांचीही आहे. यामुळे मोकळ्या जागेवर शौच करण्याचे प्रमाण कमी होईल.