Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ट्विंकल खन्ना ही अभिनेत्रीसोबतच लेखिका देखील आहे. ते पुस्तक आणि वृतपत्रांमध्ये कॉलम देखील लिहिते. आता व्हॅलेंटाईन वीक सुरु असून त्यावर ट्विंकलनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर तिनं सगळे पती त्यांच्या पत्नीला डोकं दुखी देत असतात असं देखील तिनं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये ट्विंकलनं नुकताच एक कॉलम लिहिला असून त्यात ती व्हॅलेंटाईन डे विषयी बोलताना दिसते. त्यासोबतच तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सांगितलं की पती त्यांच्या पत्नीला व्हॅलेंटाईन डेला काय भेट देतात. ही पोस्ट शेअर करत ट्विंकल म्हणाली की अशी शक्यता आहे की व्हॅलेंटाईन डेची सुरुवात ही एक प्रयोग म्हणून करण्यात आली असेल. बोर्डमध्ये काही बैठका झाल्या असतील, क्रिसमसनंतर विक्रीत कमी झाली असेल आणि मग त्या सगळ्यात शिल्लक राहिलेल्या गिफ्ट्समधून कमाई करण्याचा विचार केला असेल. तेव्हा त्यांनी विचार केला असेल की लोकांना गिफ्ट खरेदी करण्यासाठी आता प्रेरणा काय द्यावी, जेणे करून ते येऊन गिफ्ट्स विकत घेतील. दुसरीकडे जर्मन-अमेरिकेचे फिलॉसॉफर हन्ना एपेन्ड्टनं एकदा म्हटलं होतं की कोणताही अनुभव तेव्हाच येतो जेव्हा तिथं काही झालंय. एखादा अनुभव कोणी सांगितल्यावरच कळतो. त्यांच्या सर्व ग्राहकांसोबत असलेल्या नात्याला जपण्यासाठी व्हॅलेंटाईन डेची सुरुवात झाली असेल.



पुढे ट्विंकल खन्ना म्हणाली की 'जर तुम्ही कोणत्याही महिलेला विचारालं आणि त्यांनाच विचारा ज्यांच्या लग्नाला एक दशक पेक्षा जास्त काळ म्हणजेच 10 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यांना विचारा की तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला व्हॅलेंटाईन डे निमित्तानं काय भेट दिली? तर त्यांचं प्रामाणिक उत्तर असेल की नेहमीप्रमाणे डोके दुखी'


हेही वाचा : 'एवढा कसला माज...', एल्विश यादवनं एका व्यक्तिला कानशिलात लगावताच नेटकऱ्यांचा संताप


पुढे ट्विंकल म्हणाली, 'प्रेम हे नक्कीच तुमच्या नात्याला मजबूत बनवतं. मग त्यात कोमेजलेलं गुलाब असू दे. कार्ड असून दे ज्यात दोन कार्टून आहेत त्यांचं हृदय एकमेकांकडे पाहताय. भारतीय पती हे त्यांच्या पत्नीला खूप प्रेम करतात, अशात ते डोके दुखी होणं कोणत्याही व्हॅलेंटाईन डे च्या भेट वस्तू पेक्षा कमी नाही.'