मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने आपल्या खुल्या विचारांसाठी आणि बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. देशात कोणताही मुद्दा उपस्थित झाला की ती आपले मत कायम मांडत असते. त्यामुळे कधी कधी ती ट्रोलर्सची शिकार होते. त्यानंतरही ती आपले म्हणणे बिनधास्तपणे मांडत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच तिने राम रहिम याच्यावरील निर्णयावर आपले बिनधास्त मत व्यक्त केले आहे.  ट्विंकलने आपल्या रेग्युलर ब्लॉगची लिंक शेअर केली आहे.  या ब्लॉगमध्ये लिहिले की, हे या लोकांचे काम आहेत आणि मला याची कोणत्या प्रकारची अडचण नाही.  जी गोष्ट मला सर्वात जास्त खटकते की आपण कशा प्रकारे आपला मेंदू या बाबांना समर्पित केला आहे.  आपल्या आर्टिकल शिवाय ट्विंकलने दोन ट्विटही केले आहेत. 


यात म्हटले की ही आपली चूक आहे की अशा प्रकारचे बाबा आपल्यामध्ये सापडतात. आपण अशा लोकांमध्ये सूर्याचा प्रकाश शोधत असतो, पण हे लोक भ्रमित करतात. 


 




गुरमीत सिंगला २००२ च्या एका रेप केसमध्येय कोर्टाने आरोपी ठरवले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर गुरमीत सिंगचे भक्त पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात हिसंक झाले आहेत. तर काही ठिकाणी आगी लावण्यात आल्या आहेत. याचा सर्वाधिक परिणाम पंचकुला आणि सिरसा येथे पाहायला मिळाला आहे.