मुलांनी पळून जाऊन लग्न करावं ट्विंकल खन्नानं व्यक्त केली इच्छा, म्हणाली `माझा पती रात्री...`
Twinkle Khanna : ट्विंकल खन्नानं तिच्या एका कॉलममध्ये तिच्या मुलांनी पळून जाऊन लग्न करावं असं म्हटलं आहे. त्याशिवाय त्याचं कारण देखील तिनं सांगितलं आहे.
Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही गोष्टीवर सोशल मीडियावर ट्विंकल तिची प्रतिक्रिया देताना दिसते. अनेकदा ती असं काही बोलून जाते की त्याची चिंता अक्षयला देखील असते. आता ट्विंकलनं तिच्या कॉलममध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या तीन दिवस सुरु असलेल्या प्री-वेडिंग कार्यक्रमावर चर्चा करत असताना, तिनं म्हटलं की तिची दोन्ही मुलं म्हणजेच आरव आणि नितारा यांनी पळून जाऊन लग्न केलं तरी चालेल असं तिनं म्हटलं आहे.
ट्विंकल ही 'टाइम्स ऑफ इंडिया'साठी एक कॉलम लिहिते. यात तिनं बहीण रिंकी खन्नासोबत अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाविषयी सुरु असलेल्या चर्चेविषयी सांगितलं आहे. यावेळी ट्विंकलनं सांगितलं की आरव आणि नितारानं पळून लग्न करावं अशी तिची इच्छा आहे. "माझी बहीण माझ्या भटकत्या विचारांना मध्येच थांबवते. आपण नावांवर चर्चा करतोय, पण जी सगळी तयारी करावी लागले त्याचं काय? अंबानींच्या कार्यक्रमांनंतर लोकांच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. तेव्हा मी तिला म्हणाली... ठीक आहे, मी नीता वहिणींसारखी डान्स करु शकत नाही. गेल्यावेळी कोरोना असताना मी 'तम्मा तम्मा' वर डान्स करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मला वाटलं की माझी नाचण्याची पद्धत देवालाही आवडली नाही, कारण मी लगेच पडले आणि माझा पाय घसरला", असं ट्विंकलनं सांगितलं.
ट्विंकलनं सांगितलं की "माझा नवरा रात्री 10 वाजल्यानंतर जागा राहत नाही आणि आम्ही दोघं जेव्हा 20 लोकां पेक्षा जास्त लोकांना रात्री जेवायला बोलावतो तेव्हा संपूर्णवेळ चिंतेत असतो. आमचं असं असतं की बस निघून जा." तर तिनं हे देखील सांगितलं की जर त्यांच्या मुलांना वाटतं की ते आनंदीत रहावे तर ते पळून जाऊ शकतात.
ट्विंकल ही राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची लेक आहे. ट्विंकलला सुरुवातील अभिनय क्षेत्रात तिचं करिअर करायचं होतं. त्यासाठी तिनं या क्षेत्रात तिचं नशिब आजमावलं. मात्र, अक्षयशी लग्न केल्यानंतर तिनं मोठ्या पडद्यासाठी काम केलं नाही आणि लेखक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तिनं आतापर्यंत 'मिसेस फनीबोन्स', 'द लेजेंड ऑफ राइटिंग वर्ल्ड' और 'Pyjamas are Forgiving' ही पुस्तक लिहिली आहेत.