मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रानौत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील वाद चांगलाच पेटला आहे. बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण आणि मुंबईला पाक व्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. तर दसरा मोळाव्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनावर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात तुळसी वृंदावन आहे. गांजा नाही. गांजा पिकत असेल तर तुमच्या राज्यात आमच्या महाराष्ट्रात नाही. असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. हिमाचलमध्ये सुपीक जमीन असल्याचं सांगत ती म्हणाली, 'हिमाचलला देवांची भूमी म्हणून ओळख आहे. जास्तीत जास्त मंदिरे हिमाचलमध्ये आहेत. गुन्हेगारीचं प्रमाण देखील शून्य आहे असं ती म्हणाली. 


शिवाय हिमाचलची जमीन सुपीक आहे त्यामुळे या जमीनीवर सफरचंद, किवी, डाळिंब, स्ट्रॉबेरी पिकतात असं म्हणत तिने हिमाचलच्या जमीनीवर काय पिकतं त्याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.