मुंबई : टेलिव्हिजन शो 'इंडियन आयडॉल ११'मध्ये गायिका नेहा कक्कड  (Neha Kakkar) जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तर याच 'इंडियन आयडॉल ११' शोमध्ये सिंगर आदित्य नारायण होस्टिंग करतो. शोमध्ये नेहा आणि आदित्यच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आल्याचं बोललं जातंय. १४ फेब्रुवारी रोजी ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता त्यांच्या लग्नाबद्दल खुद्द आदित्यचे वडील आणि प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी मोठा खुलासा केला. एका मुलाखती दरम्यान त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्ना संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ही अफवा फक्त शोच्या टीआरपीसाठी पसरवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 


ते पुढे म्हणाले, 'आम्ही आदित्यच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहोत आणि जर या अफवा सत्यात उतरल्या तर मला फार आनंद होईल. नेहा चांगली मुलगी आहे. पण अद्याप आदित्य आणि माझं यासंदर्भात बोलणं झालेलं नाही.'



काही दिवसांपूर्वी 'इंडियन आयडॉल ११' कार्यक्रमात नेहा कक्कड आणि आदित्य नारायण या दोघांचे आई-वडील पोहचले होते. कार्यक्रमादरम्यान आदित्यने, नेहाची त्याच्या आई-वडिलांशी भेटही घडवून आणली. गायक उदित नारायण यांनी शोमध्ये एन्ट्री करताच ते आदित्य आणि नेहाचं लग्न ठरवण्यासाठी आले असल्याचं सांगितलं. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.