मुंबई : 2019 मध्ये अनेक वरिष्ठ नेत्याच्या आयुष्यावर आधारित सिनेमे तयार होत आहेत. 'द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' प्रदर्शित झाल्यानंतर 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' त्याचप्रमाणे 'माय नेम इज रागा' सिनेमाच्या माध्यमातून कॅंग्रेंस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आयुष्यावर आधारित सिनमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असुन सिनेमाचे नाव 'गडकरी' ठेवण्यात आले आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अनुराग भुसारी यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सिनेमाच्या दिग्दर्शकांनी सांगितल्याप्रमाणे, सिनेमात गडकरींच्या व्यक्तिगत आयुष्यावर कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. सिनेमात फक्त त्यांनी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सिनेमात त्यांनी आलेल्या अडचणींचा कशा प्रकारे  सामना केल्याचे दाखवण्यात आले. त्यांच्या बालपणापासून आणि मग विद्यार्थी लीडरमधून केंद्रीय मंत्री होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.


२० लोकांच्या सहकार्याने सिनेमाचे काम डिसेंबर महिन्यात सुरु केले. ६ महिन्यांच्या संशोधानंतर सिनेमा दोन महिन्यात पूर्ण करण्यात आला. सिनेमात अभिनेता राहुल चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमा ५ मार्चच्या आधी यूट्यूबवर दाखल होणार आहे.