Radhika Merchant Unseen Photos: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. दोघांनी गेल्या महिन्यात 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्न केले. लग्नानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट पॅरिसमध्ये एकत्र सुट्टी घालवत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच या दोघांचे पनामाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापूर्वी अनंत आणि राधिका त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह पॅरिसमध्ये होते जिथे त्यांनी ऑलिम्पिक खेळांचा आनंद लुटला आणि पॅरिसचा दौराही केला. यावेळी राधिका आणि अनंत खूपच सिंपल लूकमध्ये दिसले. 



दरम्यान, त्यांच्या लग्नाचे काही न पाहिलेले फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये राधिका मर्चंट आहे. ज्यामध्ये राधिका तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की राधिका मर्चंट तिच्या मित्रांनी घेरलेली आहे आणि ती आणि तिचे मित्र हसत आहेत.


यामध्ये राधिका मर्चंटने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. राधिका या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर, तिच्या मैत्रिणींनी फिकट गुलाबी पीच आणि बेज टोनचे कपडे घातले आहेत. ते कपडे प्रसिद्ध डिझायनर डबिरी कोचर यांच्या कलेक्शनमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. 


राधिकाचे न पाहिलेले फोटो व्हायरल 


अनंत आणि राधिका यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. अशातच राधिकाचे न पाहिलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राधिका पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये राधिका तिच्या मैत्रिणींसोबत खूप हसताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये राधिका लाजताना दिसत आहे. हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबतच फोटोंना एक कॅप्शन देखील देण्यात आले आहे.