मुंबई : बॉलिवूडची दिग्गज कलाकार रेखा खूप दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. मात्र रेखा कोणत्याही कार्यक्रमात गेली की, ती मैफिल तिची होते. रेखा सगळ्यांना आपलस करून घेते. रेखा अशी व्यक्ती आहे जिच्या प्रकाशझोतापासून कुणीच सुटलेलं नाही. रेखाचं आयुष्य एका बंद पुस्तकाप्रमाणे आहे. जसं जसं तिच्या आयुष्या जवळ आपण जातो तस तसे नवे गुपित समोर आले. रेखाचं आयुष्य हे रहस्याने भरलेले आहे. तिच्या आयुष्यातील 5 अशा गोष्टी ज्यामुळे तुम्हाला देखील बसेल धक्का 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) 10 ऑक्टोबर 1954 चैन्नईत रेखाचा जन्म झाला. रेखाची आई पुष्पवल्ली तमिल अभिनेत्री होती. 50 व्या दशकात केमिस्ट्री करता करता अभिनेता बनलेल्या गणेशन यांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केलं. मीडिया रिपोर्टनुसार आई - वडिलांच लग्न होण्याअगोदरच तिचा जन्म झाला. रेखा यांचे आपल्या वडिलांशी कधीच चांगले संबध नव्हते. वडिलांनी नातं सुधारण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांनी कधीच याकडे लक्ष दिलं नाही. 


2) रेखा यांनी 14 वर्षाची असताना अभिनयाला सुरूवात केली. जेव्हा रेखा छोटी होती तेव्हा तिला जाडी आणि काळी असे शब्द वापरून हिनवत असे. 15 वर्षांची असताना रेखाने अनजाना सफर या सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं. 1969 मध्ये सुरू झालेला हा पहिला सिनेमा मात्र तो 8 वर्षांनी रिलीज झाला. 


3) रेखा यांचा जन्म चैन्नईत झाला त्यामुळे त्यांना हिंदी बोलता देखील येत नव्हतं. मात्र हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवताच त्यांनी उत्तम सिनेमे दिले. रेखा यांनी 'उमराव जान' या सिनेमातून प्रेक्षकांची मन जिंकली. 


4) 80 च्या दशकात दिल्लीतील मुकेश अग्रवाल हे रेखा यांच्या जीवनात आहे. दोघांनी काही काळ एकमेकांना जाणून घेतलं आणि मग लग्नाचा निर्णय घेतला. मात्र हा संसार खूप काळ टिकला नाही. अगदी लग्नाला 7 महिने झाले त्यानंर मुकेश यांनी डिप्रेशनमध्ये जाऊन फार्महाऊसवर आत्महत्या केली. 


5) असं म्हटलं जातं की, रेखा यांनी अभिनेता अमिताभ यांच्याशी लपून लग्न केलं. असं म्हटलं जातं की, ऋषी कपूर - नीतू सिंहच्या लग्नाच्या दिवशीच यांनी देखील लग्न केलं. त्यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये रेखा सिंदूर आणि मंगळसूत्र घालून गेली होती.