मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'खिचिक' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता सोशल मिडियावर 'खिचिक'चं पोस्टर लॉन्च करण्यात आलंय. हातात बांबू घेऊन असलेला सिद्धार्थ जाधव आणि गिटारसह प्रथमेश परबचा वेगळाच अंदाज पोस्टरमधून पाहायला मिळतोय. या दोघांसह पोस्टरमध्ये इतक दोन लहान मुलंही दिसतात. नेहमीच्या पोस्टरपेक्षा हे पोस्टर वेगळं दिसत असल्यानं 'खिचिक' लक्षवेधी ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडाला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एस. के पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन केलं आहे. 



सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण, यश खोंड हे कलाकार 'खिचिक'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या नावातून नीटसं काही कळत नसल्याने चित्रपटाची कथा गुलदस्त्यात आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.