मुंबई : OTT प्लेटफॉर्म्सवर जुलै महिन्यात एकापेक्षा एक अशा जबरदस्त वेबसिरिज आणि सिनेमांचा पाऊस पडणार आहे. यात हसीन दिलरूबा आणि तूफान या सिनेमांचा समावेश आहे. हे सिनेमे सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांना पाहता येणार होते, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भामुळे हे सिनेमे आता ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहेत. जुलै महिन्यात कोणता सिनेमा तुम्हाला केव्हा आणि कुठे पाहायला मिळणार ते आता सविस्तर रित्या जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 जुलैला एमएक्स प्लेअरवर अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेली मराठी वेबसिरिज 'समांतर'चं दुसरं सीजन रिलीज होणार आहे.या वेबसिरिजमध्ये स्वप्नीलसोबत 'महाभारत'मध्ये कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्या सीजनमध्ये ही त्यांनी हे पात्र खेळवून ठेवलं होतं.



त्यानंतर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर 2 जुलै रोजी 'द टुमारो वॉर' हा इंग्रजी सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर 'हसीन दिलरुबा' हा सिनेमा रिलीज होत आहे. 'द टुमारो वॉर' एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे. हा सिनेमा इंग्रजी सह हिंदी, तमिळ, तेलुगूमध्ये ही पाहता येणार आहे. 



या सिनेमात एडविन हॉज, सैम रिचर्डसन, बेट्टी गिलपिन, मैरी लीन राजस्कब आणि रयान किरा आर्मस्ट्राँग यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तर 'हसीन दिलरुबा' सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेता विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिका साकारत आहेत.



डिझनी प्लस हॉटस्टार VIP वर 9 जुलैला 'कॉलर बॉम्ब' सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमात जिम्मी शेरगिल और आशा नेगी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Zee5 वर 9 जुलैला 'स्टेट ऑफ सीज: टेंपल अटैक' ही सीरिज प्रीमियर होणार आहे, हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अक्षय खन्ना या सीरिजमधून ओटीटीवर डेब्यू करणार आहे.



15 जुलैला नेटफ्लिक्सवर 'नेव्हर आय हॅव एव्हर'चा दुसरा सीजन प्रदर्शित होणार आहे. हा रोमॅन्टिक कॉमेडी शो आहे. पाठोपाठ 16 जुलैला अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर फरहान अख्तरचा 'तूफान' रिलीज होणार आहे. या सिनेमात मृणाल ठाकुर लीड रोल दिसणार आहे.


23 जुलैला नेटफ्लिक्सवर  'फिल्स लाइक इश्क एंथोलॉजी' ही सीरीज़ रिलीज होणार आहे. आयुष्मान खुराना की पत्नी ताहिरा कश्यपने या सीरिजचे दिग्दर्शन केलं आहे.जुलैमध्ये Zee5 वर '14 फेरे' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज होणार आहे.