`भाईजानने आमच्या चित्रपटाची वाट लावली!` उपेंद्र लिमये, तरडे सलमानवर का चिडले?
सलमानच्या या रिमेकचं नाव अंतिम : द फाइनल ट्रुथ` आहे या सिनेमात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकला होता. हा सिनेमा बॉक्सि ऑफिसवर चांगलाच आपटला. आता या सिनेमावर मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रविण तरडे आणि अभिनेते उपेंद्र लिमये यांनी प्रतिक्रीया दिलीये.
मुंबई : प्रविण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न २०१८मध्ये प्रदर्शित झाला. 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. हा चित्रपट त्यांना चांगलाच पसंतीस पडला होता. त्यामुळे त्यांनी 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.वाढत्या शहरीकरणासाठी जमिनी बळकावल्या जातात या वादावर हा सिनेमा भाष्य करतो. जिल्ह्यातील मूळशी तालुक्यात जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री करून शहरांची हद्दवाढत आहे. त्या वाढत्या शहरीकरणातील जमिनीच्या वादावर हा सिनेमा भाष्य करतो. सलमानच्या या रिमेकचं नाव अंतिम : द फाइनल ट्रुथ' आहे या सिनेमात आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकला होता. हा सिनेमा बॉक्सि ऑफिसवर चांगलाच आपटला. आता या सिनेमावर मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रविण तरडे आणि अभिनेते उपेंद्र लिमये यांनी प्रतिक्रीया दिलीये.
बोल भिडू या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिलीये. यावेळी बोलताना उपेंद्र लिमेय म्हणाले, 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यावर कॉलर तोंडात पकडून व्हॉट अ फिल्म, व्हॉट अ फिल्म करणाऱ्या सलमान खानने जेव्हा प्रत्यक्षात तो चित्रपट केला तेव्हा त्याची वाट लावून टाकली.'' यापूढे लगेच प्रविण तरडे म्हणाले, ''तो त्यांनी केला. महेश सर यांनी दिग्दर्शित केला. माझा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. आज मी जाहीरपणे सांगू का? मी अजूनही 'अंतिम' नावाचा चित्रपट पाहिला नाही आणि मी तो पाहण्यासाठी धाडस करणार नाही.
कारण माझ्या हृदयात आणि डोक्यात 'मुळशी पॅटर्न' आहे.'' यानंतर उपेंद्र लिमये म्हणतात की, ''प्रश्नच नाही. मी दोन्ही चित्रपटांत काम केलेलं आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, जितकी प्रामाणिक, अस्सलं मातीतली कलाकृती प्रवीण तरडेने केली ना. हिंदीत सर्वोकृष्ट करण्याच्या नावाखाली या चित्रपटातला जीवच घालवून टाकला, असं मला वाटतं. जरी तो 'मुळशी पॅटर्न' जसाच्या तसा हिंदीत केला असता, तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असता.''
पुढे प्रवीण तरडे म्हणाले की,''माझं तर म्हणणं होतं, फक्त आयुष शर्माला घ्या, बाकी सगळी टीम मराठीत जी होती तीच ठेवा. तोच दया, तोच पिट्या, तोच प्रवीण, तोच उप्या आख्ख तेच ठेवा बदलूच नका.'' ''पण तो चांगला करण्याच्या नावाखाली त्या चित्रपटाचा आत्माच हरवून बसले'', त्यानंतर तरडे म्हणाले की, ''पण मला बरं झालं असं वाटतं. कारण ज्यावेळी मी हिंदीत चित्रपट करेन, तो सिनेमा माझा माइलस्टोन चित्रपट असेल.'' अशी प्रतिक्रीया देत आपलं मत व्यक्त केलं आहे.