मुंबई : लोकप्रिय शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये त्यांना रात्री उशिरा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर स्वतः राहत इंदौरी यांनी ट्विट करून माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतलज इंदौरी यांच्या म्हणण्यानुसार, राहत इंदौरी यांनी इंदौरच्या ऑरबिंदो रूग्णालयात दाखल केलं आहे. जे रुग्णालय कोविड स्पेशव असून आता त्यांची प्रकृती ठिक आहे. काळजीचं कोणतंच कारण नाही. 



राहत इंदौरी यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय,'कोरोनाची सुरूवातीची लक्षण दिसू लागल्यामुळे मी कोरोनाची चाचणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ऑरबिंदो रुग्णालयात मला दाखल केलं आहे. प्रार्थना करा मी लवकरात लवकर कोरोनावर मात करेन. आणखी एक विनंती आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना फोन करू नका. माझ्या तब्बेततीची माहिती तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळेल.'



प्रसिद्ध शायर राहत इंदौरी हे करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी या अगोदर धावून आले होते. त्यांनी करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यास स्वतःच घर देखील वापरण्यास देण्याची तयारी दर्शवली होती.