नवी दिल्ली : उर्दू भाषेवरील प्रभुत्त्व आणि तितक्याच समर्पक उदाहरणांचा वापर करत काही महत्त्वाच्या आणि वास्तवदर्शी मुद्द्यांवर भाष्य करणारं साहित्य लिहिण्यासाठी राहत इंदौरी rahat indori प्रसिद्ध होते. शेर- शायरीच्या विश्वात तर त्यांचं साम्राज्यच होतं असं म्हणायला हरकत नाही. सानथोरांपासून प्रत्येकाच्या मनात घर केलेल्या इंदौरी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पण, शायरीच्या माध्यमातून ते कायमच सर्वांसोबत असतील. सध्या सोशल मीडियावर त्यांचे असेच काही शेर पोस्ट करण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदौरी यांनी कायमच असे काही मुद्दे त्यांच्या शब्दांवाटे मांडले ज्यांना खऱ्या अर्थानं मरण नाही. याचीच प्रचिती येते बाबरी मशिदीबाबत लिहिलेल्या त्यांच्या या ओळींतून. 


'टूट रही है हर दिन मुझमें इक मस्जिद
इस बस्ती में रोज दिसबंर आता है'


देशभरात राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा मुद्दा चर्चेचा आणि राजकारणाचा मुद्दा ठरत असताना इंदौरी यांचे हे शब्द लक्ष वेधत होते. 


फक्त बाबरीबाबतच नव्हे, श्रीरामचरितमानसामध्ये आलेल्या बंधुप्रेमालाही त्यांनी शब्दबद्ध केलं होतं.  


'मेरी ख़्वाहिश है कि आंगन में न दीवार उठे
मेरे भाई मेरे हिस्से की ज़मी तू रख ले'


या इंदौरी यांच्या ओळी त्याचंच एक उदाहरण. 


शब्द आणि भावनांचा अचूक मेळ साधत जगण्यातील प्रत्येक रंग, घडामोडींवर इंदौरी यांच्या कलेचं हे अनोखं सादरीकरण अनेक पिढ्यांसाठी आदर्श प्रस्थापित करणारा असेल असं म्हणायला हरकत नाही.