मुंबईः सतत चर्चेत असणारी उर्फी ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे लोकांना आकर्षित करणारी उर्फी जावेद रोजच चर्चेत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॅशन आयकॉन बनलेली उर्फी जावेद प्रत्येक दिवशी काही ना काही करतच असते. ती जे करते ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं. आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या नव्या फॅशन प्रयोगाचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा ग्लॅमर आणि बोल्डनेसचा तडका दाखवताना दिसते आहे. 


सोशल मीडियावर सक्रिय असलेली उर्फी अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या प्रोफाइलवर अपलोड करत असते. या फोटो आणि व्हिडिओंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आज उर्फीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती स्नूकर टेबलवर तिचे गेमिंग कौशल्य दाखवताना दिसत आहे. 


उर्फीने पुन्हा एकदा निळ्या डेनिम्ससह केशरी फ्रंट ओपन टॉप घातला आहे. हा ड्रेस सर्वांसमोर सादर करताना उर्फी जावेद अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये पूल खेळताना दिसत आहे. 


आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये सर्वांच्या ओठावर असलेल्या उर्फीचा हा लूक पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. नेहमीप्रमाणे या आउटफिटमध्येही उर्फीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उर्फीचा हा केशरी रंगाचा टॉप फक्त एका पातळ स्ट्रिंगने जोडलेला आहे. 


हा व्हिडीओ अपलोड होताच काही लोक उर्फीच्या या लूकचे कौतुक करत आहेत तर काही जण तिला व्यवस्थित कपडे घालण्याचा धडाही शिकवत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


उर्फीच्या या व्हिडिओवर सतत कमेंट होत आहे. एका यूजरने लिहिले, 'क्यूट लुक.' दुसर्‍याने लिहिले, 'आय लव्ह यू उर्फी जावेद.' दुसरीकडे, या व्हिडिओवर कमेंट करताना उर्फीने 'खेलना भी आता है इसको?' याशिवाय काही लोक या व्हिडिओवर अश्लील कमेंट करत आहेत.