Urfi Javed : उर्फी जावेद टिव्ही इडंस्ट्रीमध्ये ओळखले जाणरे मोठं नाव झालंय. अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी (Fashionsense) ओळखली जाते. ती सोशल मीडियावर ही तितकीच सक्रिय (Active) असते. अनेकदा तिच्या मादक फॅशनसेन्समुळं ट्रोल देखील होते. पण तिने आजवर कधीही लोकांचे मनोरंजन (Entertainment) करणे थांबवले नाही. काहीजण म्हणतात,ती पब्लिसिटी स्टंटसाठी असे कपडे घालत असल्याचं  सांगितले जाते. पण या फॅशनमुळे ती अनेकदा अडचणीत ही येते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओसाठी चर्चेत असते. यावेळेस उर्फीचा दिवाळीचा एका व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे.  या व्हिडीओत ती चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali Wishes) देताना दिसतेय. (urfi Javed boldest prediction so far video has come out nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हे ही वाचा - 'हे' स्टार कपल बॉलिवूडपासून दूर.. डिवोर्सच्या बातम्यांना पुन्हा उधाण



भारतात दिवाळीचा उत्साह जोरदार पाहायला मिळत आहे. सगळेच दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहेत. सध्या बॉलीवूडमध्ये पार्टीस जोरात सुरु आहे. अशातच उर्फीनं नेहमीप्रमाणं एक व्हिडिओ शेअर करत सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे खेचून घेतलं. हे काही नवीन नाही, आता तर उर्फीच्या या अवली व्हिडिओची सगळ्यांनाच सवय झाली असेल. 


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


उर्फीनं तिच्या इंन्सटग्राम अकाउंटवर टॉपलेस व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्या व्हिडिओमुळे तिला चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे. 


हे ही वाचा - शाहरुख खानच्या बायकोने केले कतरिना कैफच्या घराचे मेकओव्हर... पाहून व्हाल थक्क..


 


‘सर्व मर्यादा ओलांडल्या’, असं एका युजरने म्हटलंय. तर ‘अरे दिवाळीत तरी काही चांगलं कर’, असा सल्ला दुसऱ्या नेटकऱ्याने दिला. काहींनी तर उर्फीच्या अकाऊंटला रिपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. ‘दिवाळीची खिल्लीच उडवली आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.


आणखी वाचा - 'या' अभिनेत्रींचे फोटो पाहून आई म्हणाली हे ताबडतोब थांबवा.. ती वयाने लहान...



या जगात प्रत्येकालाच स्वातंत्र्य आहे. कोणी कोणते कपडे घालावे कसं दिसावं हे ज्याचे त्याचे गणित असते. सगळ्यांनाच चांगलं दिसायला आवडत असते आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न देखील करते जर माझा एखादा ड्रेस लोकांना आवडत नसेल तर ती त्यांची समस्या आहे. त्यांना मानसिकता बदलण्याची गरज आहे,” असं उर्फी एका मुलाखतीत म्हणाली होती.