Urfi Javed Bold: उर्फी जावेदने घातली इतकी बोल्ड साडी, लोकं म्हणाले, कपडे पाठवतो...
Urfi Javed म्हणजे अतरंगी ड्रेसिंग सेन्स अशी तिची ओळख झाली आहे. तिचे चाहते तिचा हॉट लूक नेहमीच एन्जॉय करत असतात.
मुंबई : उर्फी जावेद खूपच बोल्ड (Urfi Javed Bold Saree) कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहते. तिचा ड्रेसिंग सेन्स हा खूपच बोल्ड असतो. ही अभिनेत्री तिच्या विचित्र फॅशन सेन्स आणि हॉट पोशाखांसाठी ओळखली जाते. साडी असो की बिकिनी, उर्फी तिचा प्रत्येक ड्रेस वेगळ्या पद्धतीने परिधान करते. उर्फी जावेदने (Urfi Javed) अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा कधीही न पाहिलेला फोटो पोस्ट केला आहे. ती या साडीवर खूपच बोल्ड दिसते आहे.
काही वेळापूर्वी उर्फी विमानतळावर बिकिनीमध्ये दिसली होती आणि त्या लूकसाठी तिला खूप ट्रोल देखील करण्यात आले होते. उर्फी जावेदच्या ब्लाउजच्या मधोमध एक कट होता, त्यामुळे उर्फी आणखी हॉट दिसत होती. ती नेहमीच अतिशय कमी कपड्यांमध्ये दिसत असते.
Urfi Javed ने या अतरंगी साडीत आरशात सेल्फी घेतला असावा आणि हा सेल्फी आता या हसीनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत उर्फीने चाहत्यांना विचारले आहे की, 'तुम्हाला ही साडी आठवते का.. जी मी एअरपोर्टवर नेसली होती?'