मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे चर्चेत आली आहे. यावेळी उर्फीचे जे फोटो समोर आले आहेत. ते पाहून उर्फीला लाइफ पार्टनर मिळाला असून ती पांढऱ्या रंगाच्या वधूच्या  कपड्यांत दिसत आहे. याचबरोबर ती लग्न करतेय असा अंदाजही वर्तवला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या बोल्ड फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्फीने आपल्या ब्राइडल लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. समोर आलेले फोटो पाहिल्यानंतर चाहते उर्फीवर घायाळ होत असल्याचं दिसत आहेत. फोटोंमध्ये उर्फी परीसारखी दिसत आहे.



मात्र, सोशल मीडियावर उर्फीला या व्हाईट ब्राइडल लूकसाठी खूप ट्रोल केलं जात आहे. यावेळीही उर्फीने बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर काहींनी तिला ट्रोल करत म्हटलं मधूचंद्राचा लूक दिसत आहे असं म्हटलं आहे.



उर्फी जावेद तिच्या स्टायलिश, ग्लॅमरस आणि युनिक लूकमुळे सर्वाधिक चर्चेत असते. यासोबत उर्फी जावेद दररोज तिच्या लुक्सवर एकापेक्षा एक प्रयोग करताना दिसते.  सेफ्टी पिन्सपासून कँडी फ्लॉस आणि एनिमल शैलपासून ते सॅक आणि फोटोंपर्यंत, उर्फी अंगावर काहीही चिकटवून आणि ड्रेसला नाव देण्यासाठी प्रसिद्ध आहे.



उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. यासोबतच उर्फी तिच्या चाहत्यांसाठी रोज काहीना काहीतरी नवीन करते. उर्फीच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर तिचे एका पेक्षा एक बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळतील.