Urfi Javed : सोशल मीडियावर नेहमीच उर्फी जावेदच्या फॅशनची चर्चा सुरु असते. उर्फी विचित्र फॅशनसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. यावेळी उर्फीनं इको फ्रेंडली ड्रेस परिधान केला आहे. फाटलेले कपडे परिधान करते म्हणतं ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना देखील तिचे आश्चर्य झाले आहे. पण यावेळी उर्फीनं केलेल्या या हटके फॅशनच्या मागे ती नाही तर डिझायनर नील राणौतचं डोकं आहे. त्यानं हा हटके ड्रेस बनवला आहे. त्याविषयी सांगत उर्फीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात उर्फीनं थोडक्यात नील राणौतचा प्रवासही सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत डिझायनर नील रणौत हा वडाच्या पारंब्यासोबत काही तरी करताना दिसतोय. पण तो नक्की काय करतोय हे लगेच कोणालाही कळत नाही आहे. खरंतर उर्फी पहिल्यांदा एका इको फ्रेंडली ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक नेहमी पेक्षा खूपचं वेगळा दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करत आणि नीलची स्तुती करत उर्फी म्हणाली, 'बऱ्याच काळापासून नीलसोबत कोलॅबरेट करायचं होतं. त्याच्यात असलेला कॉन्फिडन्स हा खूप चांगला आहे. पैसे नसतानाही त्याच्या आजुबाजूला असलेल्या गोष्टींपासून तो ड्रेस बनवतो. मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. अबू जानी यांनी त्यांचे इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारे रील्स पाहून त्याला शोधलं आणि त्याला नोकरीची ऑफर दिली. आता तो देशातल्या मोठ्या डिझायनरसोबत काम करतो.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : खासदाराशीचं लग्न करणार म्हणणाऱ्या अभिनेत्रीचा Dating App विषयी मोठा खुलासा...


उर्फीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'तिच्या विरोधात इतकी नकारात्मकता का आहे? ती कसेही कपडे परिधान करत असली तरी देखील सार्वजनिक ठिकाणी ती विचित्र चाळे करत नाही.... तिचा एक मस्तीखोर आणि मस्त मगन असा स्वभाव आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'उर्फी खूप सुंदर दिसतेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'एक वेगळाच ड्रेस मला ही आयड्या प्रचंड आवडली.' तर काही नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'देशातून निघून जा तू.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हिला सांगा असे कपडे घालून घरीच रहा कुठे जाऊ नकोस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जंगली दिसतेस.' दरम्यान, उर्फीला ट्रोल करणाऱ्यांपेक्षा तिची स्तुती करणाऱ्यांची संख्या यावेळी जास्त आहे.