Urfi Javed Education : ‘बिगबॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद (urfi javed) ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, सोशल मीडियावर नेटकरी उर्फीचं शिक्षण किती झालं आहे ते सर्च करत आहेत. चला तर जाणून घेऊया उर्फीचं शिक्षण किती झालं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीनं लखनौच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. बारावीनंतर उर्फी लखनौ येथील एमिटी युनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. दरम्यान, उर्फीनंतर दिल्लीला निघून गेली. बिग बॉस ओटीटीमुळे प्रकाश झोतात आलेल्या उर्फीनं 2015 मध्ये 'तेढी मेढी फॅमिली' या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. उर्फीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुपरमॉडल बेला हदीदनं (Bella Hadid) सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमुळे अनेकांनी तिची तुलना ही उर्फी जावेद (Urfi Javed) सोबत केली आहे. बेला हदीदनं टॉपलेस होत फोटोशूट केलं आहे. उर्फी जावेद देखील अशा प्रकारे फोटोशूट करत असते. त्यामुळे त्यांच्या फोटोंची तुलना केली जात आहे. पण बेलाचं हे पहिलं असं फोटोशूट नाही. बेलावर याआधी उर्फी जावेदला कॉपी केल्याचा आरोप देखील होत आला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद देखील तिच्या विचित्र कपड्यामुळे चर्चेत आली होती. तिने घातलेला ड्रेस हा बेला सारखा असल्याचं काही जणांनी म्हटलं होतं. यावर उर्फीने स्पष्टीकरण देखील दिलं होतं. 


हेही वाचा : 'जी स्त्री घरात अजय देवगणला...', Kajol समोरच तिच्या पतीविषयी हे काय बोलून गेला कपिल शर्मा


Urfi Javed आणि Bella Hadid?


उर्फी जावेदने म्हटलं की, 'बेला हदीदने कान्समध्ये घातलेला ड्रेस Schiaparelli डिझाईनचा होता. पण माझा ड्रेस मी स्वत: डिझाईन केला होता.'